Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, ३० जानेवारी, २०२४

माळशिरस तालुक्यातील" कुणबी" प्रमाणपत्राचे उपविभागीय अधिकाऱ्याच्या हस्ते वाटप..

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

*मो.9730 867 448*

            माळशिरस तालुक्यातील कुणबी प्रमाणपत्राचे प्राथमिक स्वरूपात उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

 माळशिरस तालुक्यातील एकूण २७०० कुणबी नोंदी सापडल्या असून त्यापैकी २०० प्रमाणपत्रा साठी अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी छाननी करून उपविभागीय अधिकारी कार्यालया कडून माळशिरस तालुक्यातील १२५ प्रमाणपत्र वाटप करण्यात आले आहेत.

प्राथमिक स्वरूपात बाभुळगाव वाघोली येथील शालेय विध्यार्थी कु.राजवीर बाळासाहेब पराडे, पुष्कराज अमोल माने, कुमारी श्रावणी दादासाहेब पराडे, आर्वी अजित माने, उर्वी अजित माने यांना व बाळासाहेब पराडे पाटील, अजित माने यांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. सदर प्रसंगी मराठा सेवा संघाचे केंद्रीय कार्यकारणी सदस्य उत्तमराव माने, शिवाजीराव लोंढे चंद्रकांत कुंभार, तुकाराम साळुंखे इ उपस्थित होते.सदर प्रमाणपत्र मिळण्यासाठी उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर साहेब,तहसीलदार शेजूळ साहेब, नायब तहसीलदार कदम साहेब,सहाय्यक महसूल काळेल साहेब,अव्वल कारकून कोळेकर साहेब यांचे सहकार्य लाभत आहे.


चौकट-

मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर साहेब यांनी १९९० पासून मराठा समाजाचा सरसकट ओबीसी प्रवर्गात समावेश करून ओबीसी मधून आरक्षण मिळावे हि मागणी शासनाकडे करीत होते.मराठा योद्धा मनोज जरांगे यांनी तीच भूमिका मांडून शासनकडून शिंदे समिती स्थापन करून संपूर्ण महाराष्ट्रमध्ये कुणबी नोंदी असणाऱ्याला प्रमाणपत्र मिळावे हि मागणी मान्य करून घेतली व त्यानुसार संपूर्ण सोलापूर जिल्हा व माळशिरस तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाटप होत आहे तरी ज्याच्या नोंदी सापडलेल्या आहेत त्यानी तहसील कार्यालय येथे रीतसर अर्ज करून कुणबी दाखले मिळावावेत असे आवाहन उत्तमराव माने यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा