उपसंपादक - नूरजहाँ शेख
टाइम्स 45 न्यूज मराठी
सत्य व अहिंसेचा मार्ग ज्यांनी जगाला दाखविला व ब्रिटिशांच्या जुलमी साखळदंडातून भारत मातेस स्वतंत्र केले या भारत मातेच्या सुपुत्रास फिनिक्स इंग्लिश स्कूल २५/४ लवंग मध्ये मानवदंना देण्यासाठी चिमुकल्यां विद्यार्थ्यांनी भाषणाची जोरदार तयारी केली देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी साजरी करण्यासाठी प्रमुख पाहुणे .पी.एस.आय. अहमद बक्षी उपस्थित होते त्यांनी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन केले व पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले .या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष समाधान जगताप उपाध्यक्ष दशरथ दगडे,पालक संघाचे उपाध्यक्ष रेवन भोळे ,प्रगतशील बागायतदार रणजित चव्हाण, योगेश रेडे पाटील यांनी प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला .
विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी यांच्या विषयावर भाषणे करून उपस्थितांची मने जिंकली . शाळेच्या संचालिका नूरजहाँ शेख यांनी गांधीजींच्या संघर्षमय जीवनाचा आढावा घेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाच्या शेवटी गुलशन नशीब शेख यांनी उपस्थितांचे आभार मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा