टाइम्स 45 न्युज मराठी
मो.9730 867 448
तुळजापुर येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख शामलताई वडणे यांच्या शुभहस्ते तुळजापुरातील पत्रकारांचा सत्कार संपन्न झाला.
आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पणकार यांच्या जन्मदिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो पत्रकार दिन व माॅसाहेब स्व.सौ. मीनाताई बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताचे ( ममतादिन)औचित्य साधून पत्रकार बांधवांचा सन्मान करण्यात आला
पत्रकार बांधवांच्या सत्कार कार्यक्रम प्रसंगी
शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख शामलताई वडणे, माजी उपजिल्हाप्रमुख श्याम पवार, तुळजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुनिल जाधव, शिवसेना उपशहर प्रमुख बाळासाहेब शिंदे व धनाजी तुळशे आणि बहुसंख्येने पत्रकार बांधव आदी मान्यवर उपस्थिती होती. या पत्रकार दिनानिमित्त पत्रकार बांधवांचा शाल फेटा आणि डायरी देऊन सन्मान करण्यात आला
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा