Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, ६ जानेवारी, २०२४

बैलाच्या डोळ्यातील अश्रू पुसण्यासाठी आणि ओझे व ताण कमी व्हावा म्हणून बैलगाडी समोर टायर बसवण्याची गरज..,

 


पञकार ---इक्बाल मुल्ला 

   सांगली.

मो.8983 587 160

             "बैलाच्या " ठिकाणी माणसाला बैलगाडीला जुंपून,चाबकाचे फटकारे अंगावर मारले असते तर माणसाला किती वेदना झाल्या असत्या ?? 

बैलाच्या मानेवर 2 - 2 टन उसाचे ओझे टाकण्याऐवजी माणसाच्या "मानेवर" बैलगाडी जुंपून त्यावर उसाचे थोडे "वजन" टाकले तर ??

जर एखाद्या माणसाला चाबकाचे फटकारे मारणे निषिद्ध असतील , माणसाला बैलगाडीला जुंपून त्याच्या मानेवर माल नेणे "चुकिचे" असेल तर 10 - 15 किलोमीटर अंगावर 2000 किलो चे ओझे उचलणाऱ्या अबोल आणि मुक्या बैलांची होणारी पिळवणूक थांबण्यासाठी ,त्यांना होणारा "त्रास" कमी करण्यासाठी प्रगतशील मनुष्य जातीने "आधुनिक" तंत्रज्ञानाचा "उपयोग" करायला नको का ???

 कित्येक बैलाच्या डोळ्याखाली लालसर - रक्ताप्रमाणे पाणी दिसते . बैल देखील अश्रू ढाळत असतील का .?? या मुक्या जनावरांच्या संवेदना आपण कधी समजणार ???

बैलगाडी समोर एक रबरी टायर बैलगाडीला जोडून उसवाहतूक केली तर 100% बैलाचा भार कमी होईल . उस ओढताना बैलाचे पाय मुरगळतात ,बैल जखमी होतात , बैलाचे अपघात होतात ,त्यामुळे "रबरी टायर" ची ही वाहतूक बैलांसाठी "हितकारक" ठरणार आहे .

उत्तरप्रदेश पंजाब या ठिकाणी टायर लावलेल्या बैलगाड्या पहावयास मिळतात .परंतु महाराष्ट्रात अजूनही याचे "पदार्पण" झालेले नाही .

गेल्यावर्षी "इस्लामपूर "मधील RIT महाविद्यालयातील सौरभ भोसले ,आकाश कदम, गायकवाड ,निखिल तीपायटे ,ओंकार मिरजकर या विध्यार्थ्यानी "रोलिंग सपोर्ट" च्या माध्यमातून यंत्र निर्माण केले होते. 

अशाच प्रकारे समस्त बैलगाडी "मालकांनी" आपापल्या बैलगाडीला समोर "रबरी टायर" चे चाक बसवून , मुक्या असणाऱ्या , आपल्या "वेदना" दर्शवणाऱ्या या बैलांचा प्रवास "सुखकर "करावा. या मुक्या प्राण्याच्या आशीर्वादाने "परमेश्वर" आपणास आपली निश्चित "भरभराट" करेल !

आ . इकबाल बाबासाहेब मुल्ला ( पत्रकार)

संपादक - सांगली वेध ,

संपादक - वेध मीडिया न्यूज ,सांगली.

मोबाईल - 8983587160

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा