सदाशिवनगर प्रतिनिधी
प्रा.अर्जुन ओवाळ
टाइम्स 45 न्यूज मराठी
माळशिरस तालुक्यातील पुरंदावडे येथे श्री.ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचा पुण्यतिथीचा सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाला.आज दिवसभर मंदिरात दर्शन घेण्यासाठी भविकांनी गर्दी केली होती.या सोहळ्याला पस्तीस वर्षापासून सौ.मंगलताई थिटे यांनी सुरू केल्याचे सांगितले.दशमीला ह.भ.प. अभिमन्यू कदम यांचे भावपूर्ण, भक्तीमय किर्तन झाले.
नगर प्रदक्षिणा दिंडी आबालवृद्धानी काढून गावात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.माळशिरस तालुक्यातून मोठ्या संख्येने भाविक हजर होते.दिवसभर महाप्रसादाचा लाभ हजारो भाविकांनी घेतला.
हा आनंद सोहळा यशस्वी करण्यासाठी ब्राह्मचैतन्य सार्वजनिक वाचनालयाचे सर्व संचालकांनी परिश्रम घेतल्याचे थिटे परिवाराने सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा