Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, २५ जानेवारी, २०२४

डॉ. यशवंतराव कुलकर्णी यांना 'भारतीय शुगर 'चा "बेस्ट एमडी" पुरस्कार जाहीर...

 


*श्रीपूर---बी.टी.शिवशरण.*

            कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे कर्तव्यदक्ष कार्यकारी संचालक डॉ यशवंतराव कुलकर्णी यांना राष्ट्रीय पातळीवरील भारतीय शुगरचा बेस्ट एमडी पुरस्कार जाहीर झाला आहे सदर संस्था राष्ट्रीय पातळीवरील नामांकित असून डॉ यशवंतराव कुलकर्णी यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आहे सदर पुरस्कार सोहळा दहा फेब्रुवारीला कोल्हापूर येथे उच्च पदस्थ अधिकारी व सहकार क्षेत्रातील तज्ज्ञ राजकीय नेते यांचे उपस्थितीत डॉ कुलकर्णी यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याला आता पर्यंत देशपातळीवरील पन्नास हुन अधिक आदर्श व उत्तम कार्यप्रणाली बद्दल पुरस्कार मिळाले आहेत योग्य नियोजन शिस्तबद्ध पद्धतीने कामकाज तांत्रिक सक्षमता सुयोग्य आर्थिक स्थिती यामुळे कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखाना देशपातळीवर अग्रगण्य म्हणून लौकिकार्थाने आदर्श ठरला आहे कुलकर्णी यांना आज जाहीर झालेल्या पुरस्काराची दखल कारखाना संचालक मंडळ चेअरमन व्हा चेअरमन अधिकारी वर्ग कामगार शेतकरी सभासद यांनी घेऊन त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे स्थानिक पातळीवर सामाजिक संघटना नेते कार्यकर्ते यांनी समक्ष भेटून फोनवर त्यांचे अभिनंदन केले आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा