Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, २५ जानेवारी, २०२४

सदाशिवनगर येथील कर्मवीर बाबासाहेब पाटील विद्यालय व जुनियर कॉलेज मध्ये" राष्ट्रीय मतदार दिन साजरा"

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

   *मो.--9730 867 448*

            शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूज संचलित, कर्मवीर बाबासाहेब पाटील विद्यालय व जुनिअर कॉलेज सदाशिवनगर येथे दिनांक 25/1/2024 रोजी राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमा च्या अध्यक्षस्थानी प्राचार्य पोपटराव देठे होते .



   या प्रसंगी प्राचार्य देठे सरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन त्यांनी नवमतदाराचा निवडणूक प्रक्रियेतील सहभाग देशहितासाठी महत्वाचा असल्याचे सांगितले . तसेच या कार्यक्रमात नवमतदाराचा सत्कार प्राचार्य यांच्या हस्ते करण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार विद्यार्थ्यांना लोकशाहीतील मतदानाचे महत्त्व पटवून देण्यात आले . कार्यक्रमाचे व्याख्याते म्हणून विजय निंबाळकर सर हे होते. त्यांनी आपल्या व्याख्याना मध्ये लोकशाही मधील निवडणूक आयोगाची भूमिका स्पष्ट केली .व्याख्यान झाल्यानंतर विद्यार्थ्यांसमोर मतदारांसाठी प्रतिज्ञा देण्यात आली.



          या कार्यक्रमासाठी पर्यवेक्षक चंद्रकांत कवटे सर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना या विभागाकडून करण्यात आले होते. कार्यक्रम अधिकारी बागल बी.व्ही तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा