उपसंपादक----नुरजहाँ शेख
टाइम्स 45 न्युज मराठी
उंबरे (वेळापूर )येथील शाळेच्या प्रांगणात विद्यार्थ्यांनी आठवडा बाजार भरविला होता शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना व्यवहारिक ज्ञान यावे या उद्देशाने या आठवड्या बाजाराचे आयोजन करण्यात आले होते
या बालआनंद बाजाराचे उद्घाटन अकलूज ग्रामपंचायतचे माजी सदस्य आणि युवा नेते "क्रांतिसिंह माने पाटील" यांच्या हस्ते करण्यात आले विशेषतः या बाजाराचे वैशिष्ट्य म्हणजे "प्लास्टिक कागद हटवू या वसुंधरेला वाचवू या" हा उद्देश बाळगून बाल चिमुणी आठवडे बाजार भरवला होता
या बाजारात खाऊचे विविध स्टॉल मध्ये पाणीपुरी स्टॉल, भेळ स्टॉल ,मिसळ पाव स्टॉल, वडापाव स्टॉल ,भजी स्टॉल, चहा स्टॉल ,तसेच परस बागेत पिकणारा सर्व भाजीपाला संक्रांति सणासाठी लागणारे वाणं, क्रीडा साहित्य ,तसेच सौंदर्यप्रसाधनाचे साहित्य इत्यादी सर्व वस्तू विकण्यासाठी आणल्या होत्या किमान 200 विद्यार्थ्यांनी या बाजारात सहभाग नोंदवला तसेच खरेदीसाठी गावातील सर्व ग्रामस्थ, ज्येष्ठ नागरिक, महिलावर्ग बचत गट महिला वर्ग, या सर्वांची गर्दी झाली होती बाल यावेळी "बालआनंद "बाजाराचे उद्घाटक" क्रांतिसिंह माने पाटील" यांनी बाजारातून 10,000 रुपयांची खरेदी केली
*खरेदीसाठी गर्दी*
जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य, महिला वर्ग ,बचत गट महिला वर्ग ,गावातील सर्व ज्येष्ठ नागरिक ,यांनी खरेदीसाठी गर्दी केली होती सर्व प्रतिष्ठा व्यावसायिक शिक्षण, व्यवहार ज्ञान ,पुस्तकी ज्ञाना ,चे उपयोजन मूल्यांची जोपासना करणाऱ्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे
या बाल आनंद आठवडे बाजारासाठी' क्रांतिसिंह माने पाटील 'राजेंद्र माने, सोमनाथ पवार, संदीप माने ,उंबरे वेळापूर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष -अमोल केचे ,माजी अध्यक्ष -गणेश पाटील, ज्येष्ठ नागरिक- हरिदास भोसले, व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष-- रेवन भोसले, रणजितसिंह मोहिते पाटील सोसायटीचे माजी व्हाईस चेअरमन -अंकुश केचे ,सोसायटी चेअरमन -सिद्धेश्वर भोसले, तंटामुक्ती अध्यक्ष -ज्ञानेश्वर भोसले, सोसायटीचे व्हा. चेअरमन विठ्ठल थिटे -विनायक गुरव ,प्रमोद चव्हाण ,सुधाकर थिटे ,विनायक पाटील ,संजय गुरव ,नितीन पवार, संजय चौगुले, हनुमंत गाडेकर, राहुल भोसले, दादा थिटे, दत्ता गायकवाड ,तसेच जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक शिक्षिका आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या सर्वांच्या सहकार्यामुळे बाल आनंद आठवडी बाजार पार पडला..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा