*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.--9730 867 448*
योद्धा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शेखर भैय्या खिलारे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून योद्धा प्रतिष्ठानच्या वतीने उपजिल्हा रुग्णालय अकलूज तालुका माळशिरस या ठिकाणी नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्या शिबिराचा सर्वांनी लाभ घ्यावा अशी विनंती शेखर खिलारे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केली होती.त्याला चांगलाच प्रतिसाद मिळाला सदर शिबिरात अकलूज व परिसरातून मोठ्या संख्येने लोक आपले नेत्र तपासणी करण्यासाठी आले होते या शिबिरात एकूण २२५ रुग्णांनी नेत्र तपासणी करून घेतली व ३० रुग्णांच्या मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया पुढच्या आठवड्यात करण्यात येणार आहेत त्यावेळी डॉ.संतोष खरतरे,अमित प्रभा वसंत (सर),दादासाहेब नामदास,करणभाऊ कांबळे,बच्चन साठे,बिपिन बोरावके,संपत खिलारे,सचिन खिलारे,अविनाश सोनवणे,पप्पू मिसाळ,शिवदत्त रामदास,सचिन खिलारे,केशव भाऊ लोखंडे,लहू धाईंजे,इत्यादी योद्धा प्रतिष्ठानचे सदस्य उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा