Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, २१ जानेवारी, २०२४

विद्यार्थिनीँच्या सर्वांगीण विकासावर भर द्यायला हवा--स्वरुपाराणी मोहिते पाटील.

 


अकलुज ------प्रतिनिधी

  शकुर तांबोळी

टाइम्स 45 न्युज मराठी.

        सध्याच्या युगात मुलांच्या शैक्षणिक विकासाबरोबरच सर्वांगीण विकास होणे महत्त्वाचे आहे. शारीरिक,मानसिक व बौद्धिक समतोल महत्त्वाचा असतो.त्यामुळे विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासावर भर द्यायला हवा असे मत कु.स्वरुपाराणी मोहिते पाटील, सभापती, लक्ष्मीबाई कन्या प्रशाला, यशवंतनगर यांनी व्यक्त केले.

शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूज संचलित महर्षि शंकरराव मोहिते प्रशाला प्राथ.विभाग व लक्ष्मीबाई कन्या प्रशाला, यशवंतनगर यांचे *महर्षि महोत्सव* वार्षिक स्नेहसंमेलन शंकरनगर येथे स्मृतीभवन च्या बादशाही रंगमंचावर मोठ्या उत्साहात संपन्न झाले.



स्नेहसंमेलनाच्या सुरुवातीला सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील व श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील यांचे प्रतिमेचे पूजन कार्यक्रमास उपस्थित कु. स्वरूपाराणी जयसिंह मोहिते पाटील, सभापती, लक्ष्मीबाई कन्या प्रशाला, यशवंतनगर, अकलूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड, प्रशाला समिती सदस्य ॲड.नितीनराव खराडे, नवनाथ पांढरे, माता पालक संघ सदस्या सौ. जयश्री मदने, सौ. कांबळे, विद्यार्थिनी प्रतिनिधी कु. साक्षी मोहिते यांचे शुभ हस्ते करण्यात आले. यावेळी महर्षि गीतातून सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील यांचे स्मृतींना अभिवादन करण्यात आले.



द्वितीय सत्रात लक्ष्मीबाई कन्या प्रशालेच्या कार्यक्रमास

श्री. जयसिंह शंकरराव मोहिते पाटील चेअरमन, सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखाना, शंकरनगर यांनी उपस्थित राहून विद्यार्थिनींचा आनंद द्विगुणीत केला.तसेच पालकांना विद्यार्थिनींना प्रोत्साहित करण्याचे आवाहन केले.

महर्षि महोत्सव वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमांमध्ये लक्ष्मीबाई कन्या प्रशालेने 16 गीते सादर केली. यामध्ये 226 कलाकारांनी सहभाग घेऊन सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले.

द्वितीय सत्राचे उद्घाटन अकलूज पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्री साळुंखे साहेब यांनी केले.

त्यांनी विद्यार्थिनींना विविध छंद जोपासण्याचे आवाहन केले.

महर्षि महोत्सव वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमास वसंतराव जाधव,संचालक, शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज,नवनाथ पांढरे,सदस्य, शालेय व्यवस्थापन समिती, माता पालक संघ सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. मगर सर व श्री.कुंभार सर यांनी केले.

सारे जहाँ से अच्छा या समूहगीताने कार्यक्रमाची सांगता झाली...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा