Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, ६ जानेवारी, २०२४

"शेलक्या बारा "या कथा संग्रहाचा ९ जानेवारी रोजी माजी केन्द्रीय गृहमंञी सुशिलकुमार शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन.

 


संपादक ----हुसेन मुलाणी

टाइम्स 45 न्युज मराठी

मो.9730 867 448

            लेखक इंद्रजित पाटील लिखित ' शेलक्या बारा ' या कथासंग्रहाचे दि.०९/०१/२०२४, वार -मंगळवार राेजी तुळजापूर येथे प्रकाशन हाेणार असुन. माजी केन्द्रीयमंञी गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या शुभहस्ते होणार असून प्रस्तुत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री मधुकररावजी चव्हाण .तर प्रमुख अतिथी म्हणून धाराशिव चे आमदार कैलास ( दादा ) पाटील हे उपस्थित राहणार आहेत. या साेहळ्यासाठी जिल्हाध्यक्ष,भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, धाराशिव चे जिल्हाध्यक्ष धीरज आप्पासाहेब पाटील. श्रीकांत श्री पाटील ,काेल्हापूर ,प्रा.दि.बा.पाटील,सांगली,साहेबराव माेरे,चाळीसगाव,-मारूती वाघमोडे,अहमदनगर, डाॅ.शिवाजी शिंदे,साेलापूर,डाॅ.मधुकर हुजरे,डाॅ.अरविंद हंगरगेकर,राजेंद्र अत्रे,डी.के शेख,धाराशिव,अरूण नवले,साेलापूर,हरिश्चंद्र पाटील,टेंभुर्णी,काकासाहेब शिंदे,व्यंकटराव डाेंगरे,लातूर, प्रा.शशिकांत जाधव, लक्ष्मण हेंबाडे मंगळवेढा व महाराष्ट्रातील बरेच नामांकित साहित्यिक हजेरी लावणार आहेत.त्याचबरोबर सामाजिक,शैक्षणिक,राजकीय क्षेत्रातील बरेच मान्यवरही उपस्थित राहणार आहेत.बहुसंख्य रसिक श्रोत्यांच्या उपस्थितीत हा बहारदार साेहळा शिवपार्वती मंगल कार्यालय,तुळजापूर ( खुर्द ) या ठिकाणी संपन्न हाेणार आहे.स्व.साै.छायाबाई माधवराव कुतवळ चॅरिटेबल ट्रस्ट, तुळजापूर व मराठवाडा साहित्य परिषद शाखा,तुळजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने या प्रकाशन साेहळ्याचे आयाेजन करण्यात आले असून श्री.माधवराव आनंदराव कुतवळ व जनसेवक अमाेल (भैया) माधवराव कुतवळ हे या कार्यक्रमाचे सर्वेसर्वा आहेत. 


        लेखक इंद्रजीत पाटील यांचे हे चाैथे पुस्तक असून याआधी चातक,चाकरी ( कवितासंग्रह ), जीवनाचा उपासक - कर्मवीर लाेहाेकरे गुरूजी ( चरित्र ग्रंथ ) ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत व पुढे सलग बारा पुस्तके येत आहेत.त्यांना बरेच राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले असून इ.स २०२३ चा उत्कृष्ट साहित्यिक पुरस्कारही मिळाला आहे.त्यांच्या या साहित्यिक कामगिरीचे सर्वत्र कौतुक हाेत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा