Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, ६ जानेवारी, २०२४

महाराष्ट्रातील "ड्रायव्हर भाऊ" 9 जानेवारी 2024 च्या मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर जाणार---- हनुमंत माने.

 


संपादक ----हुसेन मुलाणी

टाइम्स 45 न्युज मराठी

मो.9730 867 448

            ओन्ली ड्रायव्हर भाऊ मदत संघ सामाजिक संस्था ही मंगळवार दि. 9 जानेवारी 2024 च्या मध्यरात्रीपासून महाराष्ट्रातील सर्व ड्रायव्हर संघटनांनी "बेमुदत बंद" (बेमुदत संपावर) आवाहन करण्यात आले आहे याबाबत ओन्ली ड्रायव्हर भाऊ मदत संघ सामाजिक संस्थेच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आले आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की ओन्ली ड्रायव्हर भाऊ

मदत संघ सामाजिक संस्थेचे

संस्थापक- अध्यक्ष- हनुमंत माने, उपाध्यक्ष- दीपक लावरे, महाराष्ट्र वाहतूक अध्यक्ष रुपेश भाऊ धारैया, महिला महाराष्ट्र वाहतूक अध्यक्ष सीमाताई शिंदे, कोकण प्रदेश अध्यक्ष .राजू दादा सावंत. महाराष्ट्र सोशल मीडिया अध्यक्ष समीर गायकवाड. यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील सर्व ड्रायव्हर आपापली वाहने 9 जानेवारीच्या रात्री 12 वाजलेपासून बंद ठेवून बेमुदत संपावर जाणार असल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले



केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी जो ड्रायव्हर संदर्भात नवीन (कायदा )नियम लागू केला आहे. तो आत्यंत दुर्दैवी असुन महामार्गावर कोणतीही दुर्घटना झाल्यास ड्रायव्हर घटनास्थळा वरून पसार झाल्यास 7 लाख दंड व 10 वर्ष कारावासाच्या शिक्षेची तरतुद केल्याने .हा ड्रायव्हर वर हा एक अन्याय करणारा कायदा असुन हा नियम आम्हा ड्रायव्हर भावांना मान्य नाही. हा नियम रद्द करण्यासाठी 9 जानेवारी रात्री 12:00 वाजल्यापासून जे वाहन जिथे आहे तिथे उभे करून स्टेरिंग "छोडो आंदोलन" करण्यात येणार आसल्याचे निवेदना द्वारे इशारा देण्यात आला आहे. तरी सर्व शेतकरी वर्ग वाहनधारक (प्रायव्हेट कार, रिक्षा, दूध, भाजी, गॅस) इतर सर्व वाहने बंद राहतील यांनी दक्षता घ्यावी त्यामध्ये फक्त रुग्णवाहिका आणि स्कूल बस सोडण्यात येतील बाकी कोणालाही नाही. तरी संस्था सभासद आणि पदाधिकारी यांना विनंती आहे की आपण सर्वांनी एकत्र येऊन जिथे आंदोलन तालुका. जिल्हा ठिकाणी असेल तेथे शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यात येणार आहे म्हणजे "ना जाळपोळ, ना तोडफोड," कोणताही अतिरेक न करता. शांतपणे आंदोलन करावी अशी विनंती ड्रायव्हर भाऊंना निवेदनात करण्यात आले आहे.. आपला लढा सरकारशी आहे जनतेशी नाही. याची सर्व पोलीस प्रशासन आणि जिल्हाधिकारी व दंडाधिकारी यांनी दक्षता घ्यावी. आणि सहकार्य करावे,तसेच सर्व पत्रकार बांधवांनी ड्रायव्हर संघटनेला सहकार्य करावे अशी विनंती.निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा