अकलूज ----प्रतिनिधी
केदार लोहकरे
टाइम्स 45 न्युज मराठी
भारताच्या वैद्यकीय क्षेत्राचा संपूर्ण विश्वात तिसरा क्रमांक लागतो. अनेक देशांना भारत हा औषधे पुरवठा करतो.भविष्यात वैद्यकीय आणि तंत्रज्ञान क्षेत्राला देशात प्राधान्य असेल. स्पर्धेच्या युगामुळे प्रत्येकाची जीवनशैली बदलली आहे. कोणत्याही परिस्थितीत आपली मानसिकता ढासळू नये, या साठी प्रत्येकाने आपले आरोग्य तंदुरुस्त ठेवावे व मानसिक समाधान व स्वास्थ्य ही जपावे असे मत प्रताप क्रीडा मंडळाच्या अध्यक्षा स्वरूपाराणी मोहिते पाटील यांनी व्यक्त केले.
सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च सेंटर शंकरनगर येथे प्रताप क्रीडा मंडळाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.या प्रसंगी त्या बोलत होत्या.या वेळी प्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉ.संभाजी राऊत,डॉ.अतुल गांधी,डॉ.संतोष खडतरे,डॉ.तुषार साबळे,उपाध्यक्ष पोपटराव भोसले-पाटील,महादेव अंधारे,सुभाष दळवी,नारायण फुले,डॉ प्रवीण ढवळे,धैर्यशील रणवरे,प्रा.दत्तात्रय बागडे आदी मान्यवर प्रमुख उपस्थित होते.
या रक्तदान शिबिरात १०१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. श्रीमती रत्नप्रभादेवी शंकरराव मोहिते पाटील यांचे जन्मशताब्दी वर्षानिमित्त व जयसिंह मोहिते पाटील व मदनसिंह मोहिते पाटील या बंधूंच्या अमृत महोत्सवी वाटचाली निमित्त सदरच्या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
डॉ.संभाजी राऊत म्हणाले, प्रताप क्रीडा मंडळाचे सामाजिक कार्य कौतुकास्पद आहे.एका रक्तदात्यामुळे तीन लोकांचे प्राण वाचतात.एक युनिट रक्त दिल्याने ६५० कॅलरीज कमी होतात.४ ते ६ आठवड्यात पुन्हा शरिरात रक्त भरून येते.सामाजिक बांधिलकी जोपासत प्रत्येकाने रक्तदान करण्याचा ध्यास घेतला पाहिजे. भविष्यात प्रत्येकी चौथ्या माणसाला रक्ताची गरज भासणार आहे.आता आजाराला वय राहिले नाही.त्यामुळे रुटीन चेकअप काळाची गरज बनली आहे.
प्रस्ताविकात संजय झंजे यांनी मंडळांने मागील ४६ वर्षात रक्तदान शिबिरातून असंख्य रुग्णांना जीवदान दिले असल्याचे सांगितले.शिबिर प्रमुख डॉ.राहुल सुर्वे,विजय कोळी,सचिव बिभीषण जाधव,सदस्य यशवंत माने देशमुख,डॉ.विश्वनाथ आवड, बाळासाहेब सावंत,रामचंद्र मिसाळ,भीमाशंकर पाटील, विशाल लिके,राहुल गायकवाड, सुहास थोरात,नंदकुमार गायकवाड यांचे सह परिसरातील रक्तदाते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा