अकलूज ----प्रतिनिधी
केदार लोहकरे
टाइम्स 45 न्युज मराठी
सध्याचे जग हे सादरीकरणाचे जग आहे.जो बोलेल तोच पुढे जाईल.मुलांचे ऑब्झर्वेशन,टीम वर्क वाढावे व मुले बोलती व्हावी यासाठी अशा बालनाट्य शिबीरांचे आयोजन महत्वाचे आहे असे मत प्रा.संजय हळदीकर यांनी व्यक्त केले.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई शाखा अकलूजच्यावतीने बालनाट्य प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.या बालनाट्य समारोप प्रसंगावेळी ते बोलत होते.
यावेळी कु.राजकुंवर मोहिते-पाटील,अभिनेते अजय तपकिरे,शिवरत्न शिक्षण संस्था सचिव धर्मराज दगडे,संचालक श्रीकांत राऊत,आनंद तोडकरी, रामभाऊ काटकर,लाला मुजावर, अमित पुंज यांच्यासह नाट्य परिषदेचे सदस्य व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
कु.राजकुंवर मोहिते-पाटील म्हणाल्या, धैर्यशील मोहिते-पाटील व सौ.शितलदेवी मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चांगल्या बालनाट्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.याचा लाभ ग्रामीण भागातील अनेक कलाकारांनी घेतला.या बालनाट्याचा उपयोग प्रशिक्षणार्थी मुले आपल्या दैनंदिन जीवनामध्ये नक्कीच अवलंब करतील.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रवि नागटिळक यांनी केले. सूत्रसंचालन श्रीकांत जाधव यांनी केले तर आभार डॉ.विश्वनाथ आवड यांनी मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा