*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.--9730 867 448*
"राज्यात ज्या मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्या फसव्या असल्याचं, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. इतकच नाही तर दोन समाजांत दंगली घडवण्याचा या सरकारचा डाव असल्याचा गंभीर आरोपही प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. ते अकोला येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
मनोज जगांरेंच्या पाठीमागे गरीब मराठ्यांनी पूर्णपणे उभं राहावं. मुंबईतील आंदोलनात गरीब मराठ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं. जरांगे पाटलांना झुकवण्याचं काम सुरू आहे. आगामी निवडणुकींमुळे सरकारचा हात दगडाखाली असल्याचं जरांगेंनी लक्षात घ्यावं. जरांगेंनी येणाऱ्या लोकसभेत कोणाला पाठिंबा देण्याची भूमिका घेऊ नये. जरांगेंनी राजकीय भूमिका घ्यावी, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
मनोज जरांगे यांच्यासारखं गरीब मराठ्यांचं नेतृत्व उभं राहिलं. मनोज जरांगेंच्या नेतृत्त्वामुळे श्रीमंत मराठा हादरला आहे. त्यामुळे मनोज जरांगेंच्या आंदोलन दडपण्यासाठी सरकारवर दबाव आहे. सरकारकडून सांगण्यात येणारे आकडे फसवे आहेत. दोन समाजात दंगली पेटवण्याचा अजेंडा रावबण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू आहे. ओबीसींना उचकवण्याचे सरकारने प्रयत्न आहेत, असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला.
मराठा आंदोलनाला पाठिंबा
मुंबईतील गरीब मराठ्यांच्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा आहे. गरिब मराठ्यांनी जरांगेंच्या पाठीमागे मोठ्या ताकदीने उभं राहावं अन्यथा इथला श्रीमंत मराठा झुकणार नाही हे लक्षात घ्यावं, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.जरांगे पाटलांनी ताकद निर्माण केली आहे. त्यामुळे ते ताकदीच्या जोरावर संसदेत पोहोचू शकतात याची आम्हाला खात्री आहे. संसदेत गेल्यानंतर तुमच्या प्रश्नांचा निकाल लावता येतो. निजामी मराठा हा सल्ला जरांगेंना देणार नाहीत. दोन तीन महिन्यांत लोकसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे तो कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर गरीब मराठ्यांना आरक्षण देता येणार नाही पुढील पाच वर्ष हे आंदोलन जेवू शकतो अशी भूमिका निजामी मराठ्यांची आहे असेही आंबेडकर यावेळी म्हणाले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा