Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, १२ जानेवारी, २०२४

उस्मानाबाद येथील ५१ सामुदायिक विवाह साठी नाव नोंदणी करण्याचे आवाहन-- मागील १६ वर्षापासून मा. नगरसेवक सय्यद नादेर उल्लाह हुसैनी सर, यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन..

 


तुळजापूर ----तालुका प्रतिनिधी

  चाँदसाहेबा शेख ,

  टाइम्स 45 न्युज मराठी.

             धाराशिव (उस्मानाबाद ) येथील हजरत खाजा शंमशोद्दीन गाजी रहेमतूल्लाह वेल्फेअर सोसायटी व मा. नगरसेवक सय्यद नादेर उल्लाह हुसैनि सर यांच्यावतीने मुस्लिम समाजातील गोरगरीब वधू वरांच्या विवाह सोहळ्याचे ( ५१ शादीयांचे ) आयोजन गेल्या सोळा वर्षांपासून केले जाते यावर्षीही सोमवार ६ मे २०२४ रोजी सायंकाळी सहा वाजता आयोजन करण्यात आले असून यासाठी १४ एप्रिल ते २८ एप्रिल पर्यंत नावनोंदणी दारूल शमशिया मदरसा खाजा नगर धाराशिव (उस्मानाबाद ) येथे करण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे 

     गेल्या सोळा वर्षांपासून मा. नगरसेवक सय्यद नादेर उल्लाह हुसैनि सर व त्यांच्या हजरत खाजा शंमशोद्दीन गाजी रहेमतुल्लाह वेल्फेयर सोसायटीच्या माध्यमातून मुस्लिम समाजातील गोरगरीब वधू वरांच्या मातापित्यांना लग्नाचा (शादीचा ) नाहक त्रास होऊ नये यासाठी सातत्याने प्रयत्न केला जात आहे लग्नसोहळ्यात सहभागी वधू वराकडून ३ तीन हजार नोंदणी फीस घेऊन वधू वराना ३० ते ४० हजार रुपयांचे संसारउपयोगी साहित्य सोसायटीच्या वतीने दरवर्षी देण्यात येते 

     कोरोनाच्या महाभयंकर जीवणघेण्या साथीच्या आजारातही यामध्ये खंड पडू न देता हा सामुदायिक विवाह सोहळा शासनाचे सर्व नियम पाळून मोठ्या उत्साहात संपन्न झाला होता 

     याविवाह सोहळ्यासाठी हजरत खाजा शंमशोद्दीन गाजी रहेमतूल्लाह वेल्फेअर सोसायटीचे सर्व सभासद मेहनत घेतात आत्तापर्यंत सोसायटीच्या माध्यमातून सोळा वर्षात ६०१ जोडपी विवाहबंधनात ( शादीयांत ) अडकली आहेत यासाठी सामाजिक कार्यकर्ते , रिटायर्ड शिक्षक , पत्रकार , डॉक्टर , सामाजिक कार्यकर्ते , स्वयंसेवक व समाजातील दानशूर व्यक्ती आपापल्या परीने योगदान देतात मुस्लिम समाजातील सजग नागरिकांनी आपापल्या परिसरातील नावनोंदणी करण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन बाबा मुजावर , शेख गयासोद्दीन , जेके दादा , मूहिब अहमद , खालिद इंजिनिअर , इर्शाद कुरेशी , जबीउल्ला पटेल , शेख फेरोज , अझर पटेल , आयुब शेख यांनी केले आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा