*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.--9730 867 448*
"मी आंबेडकरवादी" सामाजिक संघटनेचा कार्यकर्ता मेळावा भरणेवाडी सचिवालयाच्या सभागृहात गुरूवार दि.१८ जानेवारी २०२४ रोजी दुपारी ११ वाजता शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत व उत्साहात संपन्न झाला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक सुरजभैय्या वनसाळे यांनी कार्यकर्ते यांना संबोधित केले.
या मेळाव्यामध्ये संघटनेच्या पुणे जिल्हा अध्यक्ष पदी उत्तम लक्ष्मण भागवत यांची, इंदापूर तालुका अध्यक्ष पदी सतिश बाळु वाघमारे, इंदापूर तालुका युवक अध्यक्ष पदी सौरभ धनवडे, पुणे जिल्हा युवक उपाध्यक्ष पदी अजय फले, इंदापूर युवती तालुका अध्यक्ष पदी कु.विद्या गायकवाड या पदाधिकाऱ्यांची संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरजभैय्या वनसाळे यांनी नियुक्ती केली.
या मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक करत असताना सुरजभैय्या वनसाळे यांनी तालुक्यातील ३५० पैकी २०० बुथ बांधण्याचा संकल्प केला. व इंदापूर तालुक्याचा पुढील आमदार आंबेडकरवादी च ठरवणार असा निर्धार केला. संविधान धोक्यात आहे, लोकशाही धोक्यात आहे आणि हे सर्व वाचवण्यासाठी आंबेडकरवादी विचाराची गरज आहे. आंबेडकरवादी च देश वाचवू शकतो त्यासाठी आंबेडकरवाद घराघरात पोहचवा असा संदेश सुरजभैय्या वनसाळे यांनी दिला.
मेळाव्याचे सुत्रसंचालन व प्रास्ताविक संघटनेचे सचिव अनिल केंगार यांनी केले तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघटनेचे संपर्क प्रमुख नागेश भोसले, युवक अध्यक्ष सौरभ धनवडे, जिल्हा युवक उपाध्यक्ष अजय फले, राजशिष्टाचार प्रमुख आप्पासाहेब कदम, मिलिंद भोसले, तालुका महिला अध्यक्षा सौ.अनिता कांबळे, भैय्या खरात, अक्षय फले, क्षितीज वनसाळे, बबलू वंचाळे, निता शिंदे, दिपाली गजरमल यांनी प्रयत्न केले. तर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लासुर्णे ग्रामपंचायत सदस्य संतोष पिपा लोंढे, सामाजिक कार्यकर्त्या मानवी शेख, ग्रामपंचायत सदस्य दीपक लोंढे, ग्रामपंचायत सदस्य अनिल पाटील, महिला नेत्या सौ. कोमल वनसाळे, तावशीचे पोलीस पाटील सागर खरात, बेलवाडीचे पोलीस पाटील बाळासाहेब गायकवाड, लाकडीचे पोलीस पाटील परमेश्वर ढोले हे उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा