अकलुज ------प्रतिनिधी
शकुर तांबोळी
टाइम्स 45 न्युज मराठी.
शिक्षण प्रसारक मंडळ संचलित महर्षि संकुलाचा सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील यांच्या 106 व्या जयंतीनिमित्त तिळगुळ वाटप व पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. प्रमुख अतिथी कुणाल बाळासाहेब होले सहाय्यक वाहन उपनिरीक्षक धाराशिव ,कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशाला समितीचे सभापती नितीनराव खराडे, प्रशाला समिती सदस्य व मुख्याध्यापक यांनी सहकार महर्षिंच्या प्रतिमेला अभिवादन केले.
मुख्याध्यापक संजय गळीतकर यांनी आपल्या प्रास्ताविकात सहकार महर्षि यांच्या ठाई असणारा प्रयत्नवाद, प्रचंड इच्छाशक्ती विकासाची दिशा, अगणित कष्ट करून निर्माण केलेली विकासाची गंगा व गरिबांना दिलेला स्वाभिमानाचा कणा या गुणांची विद्यार्थ्यांना जाणीव करून दिली.
संकुलातील विद्यार्थी श्रेया कदम, वृषाली कारमकर, श्रावणी मोहिते यांनी सहकार महर्षि यांच्या कार्याची माहिती आपल्या भाषणातून करून दिली.
सहशिक्षिका प्रतिभा राजगुरू यांनी सहकार महर्षिंच्या जीवनावरती आपले विचार पुष्प व्यक्त केले.
विद्यालयातील कला, क्रीडा सांस्कृतिक विभागातील विविध स्पर्धेत प्राविण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमुख अतिथींच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. प्रशालेचे मुख्याध्यापक संजय गळीतकर यांना सोलापूर जिल्हा शिक्षक व सेवक पतसंस्था बाळे सोलापूर यांचा आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार मिळाल्याबद्दल सन्मानित करण्यात आले. तसेच पुरस्कार प्राप्त अनिल जाधव ,बिभीषण जाधव धन्यकुमार साळवे, प्रभावती लंगोटे, सुहास थोरात, धनंजय देशमुख अभिजीत बावळे ,विशाल लिके ,शकील मुलाणी,नामदेव कुंभार यांना सन्मानित करण्यात आले.
प्रमुख अतिथिंनी आपल्या मनोगतातून खेळाचे महत्व पटवून दिले व शालेय जीवनात कष्ट केल्यास यशाचे फळ हे नक्की मिळते असे सांगत शाळेचे माजी विद्यार्थी असल्याने त्यांच्या विद्यार्थी दशेतील आठवणी जागृत केल्या.
कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांनी शैक्षणिक जीवनात मोबाईलचा वापर कमी करावा असे आवाहन केले.
या कार्यक्रमासाठी प्रशाला समिती सदस्य कैलास चौधरी ,विनोद जाधव ,नितीन इंगवले देशमुख ,नवनाथ पांढरे मुख्याध्यापिका सविता गायकवाड, मुख्याध्यापक शिवाजी पारसे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण सूर्यवंशी यांनी केले तर आभार नाझिया मुल्ला यांनी मानले...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा