पञकार ---इक्बाल मुल्ला
सांगली.
मो.8983 587 160
मुस्लिम समाजातील पटवेगार , शिकलगार, बिडीवाले भालदार , नदाफ हा "समूह" जर "स्थिरस्थावर" असेल , अर्थिक निकषावर आणि सामाजिक दृष्टीकोनातून भक्कम असेल ,राजकीय क्षेत्रात त्यांचे सदस्य असतील , डॉक्टर ,वकील बिजनेसमेन असतील आणि त्यांची प्रतिष्ठित "लॉबी " कार्यरत असेल तर या समूहाचे समस्त मुस्लिम समाजाने "अभिनंदन" आणि "स्वागत" करायला हवे ,तथापि ही "बिरादरी" सोडून मुल्ला ,पठाण ,सय्यद ,
शेख ,जमादार , आदी "समूह" सामाजिक , शैक्षणिक आणि "व्यवसायिक" क्षेत्रात पिछाडीवर का आहेत ??? या "ज्वलंत" विषयांवर कोणी आत्मचिंतन" केले आहे का ? या समूहाला फक्त कामगार न बनता मालक बनण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्या लागतील याचा "उहापोह" करायलाच हवा .
कच्छी समाज आत्मनिर्भर !
मुस्लिम असलेला कच्छी समाज हा "स्वयंभू" आहे , आर्थिकदृष्टया ते अतिशय "भक्कम" आहेत . व्यापारी क्षेत्रात त्यांनी आपला झेंडा रोवला आहे .त्यामुळे त्यांच्या आगामी पिढीसाठी त्यांना जास्त विचार करण्याची गरज नाही .
"खोजा " समाज समाधानी !
"खोजा समाजाचा" विचार करता , "अबिद भोजानी" अकबरभाई - असूभाई या तीन बंधूनी "शेकडो" खोजा नागरिकांना
"चारमिनार मसाले " च्या माध्यमातून भारतात आणि भारताबाहेर देखील प्रतिष्ठित "रोजगार " दिला आहे .आज हा समाज देखील "अभिमानाने" जगतो आहे .
"जैन " समाजाचा "आदर्श" घ्यावा !
मुस्लिम समाजासारखा "अल्पसंख्यांक" असणारा परंतु आपल्या "गगनभरारी"- प्रगतीसाठी साठी अल्पसंख्यांकचे लेबल न लावता आर्थिक - सामाजिक क्षेत्रात यशस्वी ठरलेला जैन समाज "कौतुकास" पात्र आहे . दक्षिण भारत जैन सभेच्या* या बॅनर खाली आणि कर्मवीर नागरी पतसंस्थेच्या माध्यमातून रावसाहेब पाटील हें जैन समाजाच्या "प्रगतीसाठी" "प्रयत्नशील" असतात . त्यामुळेच आज हजारो जैन समाजातील एकही तरुण "किरकोळ " काम करत नाही . प्रत्येकाला कमाल 20 ते 30 हजार पगार आहे .
मुस्लिम समाजात असा पराक्रमी नेता कोण आहे का ??? असेल तर समाजाच्या "उन्नतीसाठी" त्यांनी पुढाकार घ्यावा .त्यांना समाज "डोक्यावर" घेतल्याशिवाय राहणार नाही . लेखक माजी आमदार " स्वर्गीय सय्यद अमिन यांच्यानंतर एकही *विचारवंत सांगलीत होऊ शकला नाही. खरंच अतिशय दुर्दैवाची ही बाब आहे .
आज नाही तर कधी नाही !
. सय्यद -पठाण यांची टक्केवारी लक्षात घेतली तर या समूहातील किती डॉक्टर ,वकील ,आणि इंजिनियर आहेत ??? डॉक्टर -वकील असतील पण "हजारात" किती डॉक्टर -वकील ?? याचा ही "लोकसंख्याच्या" च्या "तुलनेत" विचार व्हायला हवा. या "शेख" बिरादरीचीही प्रगती -"भरभराट" व उन्नती व्हावी या उदात्त दृष्ठीकोनातुन या लेखाचे प्रयोजन आहे हें लक्षात घ्या .
आर्थिक* विकासापासून अलिप्त !
मोठ्या घराण्यातील असणाऱ्या आणि स्वतःला तसे मानणाऱ्या (मुल्ला - शेख ) या समूहाचा सामाजिक - आर्थिक विकास का झाला नाही ??
गॅरेज लाईन , वीटभट्टी , बांधकाम क्षेत्र , पानपट्टी व्यवसाय, फॅब्रिकेशन व्यवसाय ,अथवा कापड विक्रीचा व्यवसाय असो ..सर्वाधिक तरुण "कोण" आहेत ?? विशेषतः "शैक्षणिक" क्षेत्रात अवास्तव उदासीनता " हे त्याचे मूळ नसेल ना ? शिक्षणाकडे केलेले अक्षम्य दुर्लक्ष ही सर्वाधिक मोठी घोडचूक तर नसेल ना ???आगामी पिढीसाठी एक सुखकर "व्यासपीठ" आपणाला द्यायचे असेल तर या वास्तव आणि कटूसत्य विषयाला "गंभीरपणे" घ्यायलाच हवे .
विवाहासाठी व्यापक दृष्टीकोन हवा !
विवाहासाठी आत्तापर्यंत "मुल्ला -पठाण - सय्यद "हें आपली "मुलगी - मुलगा" आपल्याच मुस्लिम असणाऱ्या पटवेगार - बिडीवाले - अत्तार - नदाफ यांच्यात द्यायला "धजावत" होते . वास्तविक आपण सर्व मुस्लिमच तर हा अन्य्यायकारक दृष्टीकोन का होता ??? ज्या समूहाला आपण अंतर दिले ,तेच आज मुस्लिम समाजासह अन्य बहुसंख्य जनतेसाठी तारणहार आणि "मसीहा" बनत आपली निष्ठा प्रामाणिकपणे सिद्ध करत , प्रगतीपथावर आहेत. त्यांच्या तुलनेत आपण कुठे आहोत ?? याचा विचार व्हायलाच हवा !
ज्या मुल्ला -जमादार या लोकांनी "विवाहासाठी" अत्तार -नदाफ या समूहाला दुर ठेवले त्याच समाजाच्या लोकांनी आतापर्यंत किती प्रगती केली ??? किती "डॉक्टर " समाजाला दिले ?? किती वकील किती इंजिनियर दिले ?? शेख समूहात डॉक्टर , इंजिनियर नाहीत असे नाही पण त्यांची लोकसंख्या पाहता सांगलीत सर्वाधिक डॉक्टर "कोण" आहेत ?? डॉ.फैयाज शिकलगार ,तबस्सुम शिकलगार , डॉ .दिलावर नदाफ , डॉ .रईस अत्तार ,डॉ . शब्बीर तांबोळी , डॉ .पानारे ,डॉ .मंगळवारे अशी मोठी यादी सांगलीत अस्तित्वात आहे .
तात्पर्य श्रेयवाद - उच्च - नीच न पाहता समस्त मुस्लिमांनी एकत्र येऊन आपापली सर्वांगीण प्रगती करायला हवी .भारतातील सर्व
"राजकीय पक्ष" जर आपापला "स्वार्थ" पाहत असतील तर समस्त मुस्लिम समाजाने आपल्या "प्रगतीसाठी" आपल्या "उन्नती" साठी ,भविष्यातील आगामी पिढीसाठी एक ठोस आश्वासक "नियोजन" करायला नको का ??? एकत्र यायला नको का ???
शिक्षण हिच प्रगतीची "दोरी" !
मुस्लिमांनी शैक्षणिक उपाययोजना आणि व्यवसायभिमुख शिक्षणाची काटेकोर अमलबजावणी झाली आणि प्रत्येक मुस्लिम विद्यार्थ्यांचे "1 ली ते "ग्रॅजुएशन " पर्यंत "शिक्षण" पूर्ण झाले तर यशाचे द्वार उघडण्यापासून "मुस्लिमाना" कोणीही रोखू शकणार नाही . म्हणूनच समस्त मुस्लिमांनी 4 घास कमी खा ..परंतु मुलांना - आपल्या पाल्याना शिक्षण शिकवा ..! कारण हा गुरुमंत्रचं मुस्लिम समाजाची अशिक्षितपणाची , दरिद्रीतेचि ,आणि बेरोजगारीची समस्या दूर करेल. हा त्यावरील "100% तोडगा "आहे .व यामुळेच मुस्लिम समाजाची प्रगती आणि "भरभराट" होईल .धन्यवाद !
. इकबाल बाबासाहेब मुल्ला
( पत्रकार )
संपादक - सांगली वेध
संपादक - वेध मीडिया न्यूज ,सांगली.
मोबाईल - 8983587160
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा