*श्रीपूर--बी.टी.शिवशरण*.
श्रीपूर येथील प्रभाग क्रमांक पंधरा मधील नागरीसुविधा बाबत येथे महाळुंग श्रीपूर नगरपंचायत चे मुख्याधिकारी व संबंधित विभागाचे अधिकारी यांना येथील रहिवासी बी टी शिवशरण मिलिंद कुलकर्णी प्रकाश केसकर सचिन नागणे यांनी या प्रभागात बोलावून येथील रस्ते गटारी व सार्वजनिक स्वच्छता संदर्भात माहिती दिली त्यावेळी त्यांनी सर्व परिसर फिरून पहाणी केली समस्या जाणून घेतल्या पण प्रत्यक्षात याला सुमारे तेरा महिन्यांचा कालावधी उलटून गेला तरी एकही काम नगरपंचायत माध्यमातून करण्यात आले नाही नगरपंचायत चे सक्षम व निर्णायक जबाबदार अधिकारी व संबंधित विभागाचे अधिकारी हजर राहून त्यांनी रहिवाश्यांची गैरसोय लक्षात घेऊनही त्यातील एकही काम न केल्याने रहिवाश्यांतून नाराजी व्यक्त होत आहे या प्रभागात दलितांची सुमारे दहा ते पंधरा घरे आहेत त्यांच्या स्वतःच्या खरेदीच्या जागा आहेत ते नगरपंचायतला पाणी पट्टी घरपट्टी व इतर कर देत असतात दलित वस्ती सुधार निधी विकास कामांसाठी वापरला जात नाही या प्रभागातील दलित वस्ती सुधार निधीतून विकास कामे का केली जात नाहीत या बाबत विचारणा होत आहे येत्या मार्च पुर्वी जर या प्रभागातील दलित वस्ती मध्ये विकासकामे जाणूनबुजून केली जात नसतील तर संबंधित अधिकारी यांचेवर कारवाई करण्यात यावी यासाठी मुख्यमंत्री नगरविकास मंत्री जिल्हाधिकारी पालकमंत्री यांचेकडे लेखी तक्रार केली जाईल असा इशारा येथील मागासवर्गीय रहिवाश्यांनी दिला आहे गटार रस्ते हे महत्वाचे विषय आहेत गटार नसल्याने भिषण समस्येला तोंड द्यावे लागते तसेच रस्ते नसल्याने पावसाळ्यात येथे चिखल व डबकी तयार होतात सांडपाणी रस्त्यावर साचते त्यामुळे येथे नेहमी घाणीचे साम्राज्य असते डासांच्या प्रादुर्भाव मुळे रहिवासी लहान मुलांना डेंग्यू मलेरिया हिवताप खोकला ताप या आजारांना सामोरे जावे लागते नगरपंचायतने वेळीच नागरी सुविधा व दलित वस्ती सुधार निधीतून विकास कामे करुन सहकार्य करण्याची मागणी करण्यात येत आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा