*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.--9730 867 448*
सरकारने मराठा आरक्षणाबाबतीत काढलेल्या अध्यादेशाला १६ फेब्रुवारीपर्यंत आक्षेप नोंदवण्याची संधी दिलीय. त्यामुळे या काळात काय आक्षेप येतात, ते कायद्यात बसेल हे पाहावे लागेल. मराठा समाजाला कायद्यात बसणारे आरक्षण मिळाले पाहिजे ही माझी वेळोवेळी भूमिका राहिली आहे.जेव्हा या अध्यादेशावर शिक्कामोर्तब होईल तेव्हा खऱ्याअर्थाने अभिनंदन करण्याची गरज आहे. आता कुणबी प्रमाणपत्रे घेऊन मराठा समाजातील एक पिढी ओबीसीत आलेली आहे. आता त्यांनी एक मराठा, लाख मराठा म्हणायची गरज नाही. आता त्यांनी एक ओबीसी, लाख ओबीसी म्हणायला हरकत नाही असं मला वाटते. यामुळे त्यांचा विजय नकारात्मक वाटणार नाही. लोकांच्या मनावर कुठलाही ओरघडा ओढला जाणार नाही असं विधान भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी केले आहे.
*सौजन्य*
*कोकण न्यूज*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा