टाइम्स 45 न्युज मराठी
मो.9730 867 448
राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार लॉंग मार्च प्रणेते जोगेंद्रजी कवाडे सर राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप भाई कवाडे व राज्य उपाध्यक्ष राजाभाऊ इंगळे यांच्या पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या पुणे जिल्हा युवक प्रवक्तापदी इंदापूर तालुक्यातील नरसिंहपूर येथील ऋषिकेश दळवी यांची श्रीपूर येथील सदानंद बनसोडे यांची माळशिरस तालुका उपाध्यक्षपदी तर अकलूज शहर उपाध्यक्षपदी अविनाश गायकवाड यांच्या निवडी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले यांच्या हस्ते सत्कार करून निवडीचे पत्र देऊन करण्यात आल्या.
रविवार 7 जानेवारी रोजी पीपल्स रिपब्लिकन पार्टीची बैठक महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृह अकलूज या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने 26 जानेवारी रोजी उपविभागीय अधिकारी अकलूज कार्यालयासमोर विविध मागण्यासंदर्भात हालगीनादसह बोंबाबोंब आंदोलन आयोजित करण्यात आले असून या आंदोलनाचे नियोजन करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी पत्रकार दिनानिमित्त युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले यांच्या हस्ते पत्रकारांना पेन व गुलाब देऊन पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या त्यानंतर वरील तिघांच्या निवडी जाहीर करून निवडीचे पत्र देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी निवडीला उत्तर देताना पुणे जिल्हा युवक प्रवक्ता ऋषिकेश दळवी यांनी पुणे जिल्ह्यात पीपल्स रिपब्लिकन पार्टीची ताकद वाढणार असल्याचे सांगितले.
यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे माळशिरस तालुका अध्यक्ष हेमंत कांबळे युवक तालुकाध्यक्ष सचिन मोरे अकलूज शहराध्यक्ष शिवाजी खडतरे तालुका सरचिटणीस दयानंद कांबळे तालुका संघटक पांडुरंग चव्हाण तालुका खजिनदार विश्वास उघाडे तालुका संपर्कप्रमुख राजू बागवान तालुका सहसंपर्कप्रमुख रोहिदास तोरणे युवक तालुका कार्याध्यक्ष शिवम गायकवाड युवक तालुका संघटक कबीर मुलाणी अकलूज शहर उपाध्यक्ष साजिद बागवान कार्याध्यक्ष शहाजी खडतरे सरचिटणीस ऋतुराज थोरात नेवरे येथील दत्ता कांबळे यांचे सह मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा