श्रीपूर .बी.टी.शिवशरण.
आज रोजी बोरगाव येथे भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजकुमार पाटील याच्या "स्वरूपा " निवासस्थानी माळखांबी गावाचे सरपंच सौ.मंगलताई संतोष पुजारी व त्यांचे पती संतोष तानाजी पुजारी , सौ. प्रतिभा दयानंद शेळके ग्रामपंचायत सदस्या व त्यांचे पती दयानंद जग्गनाथ शेळके , सौ. ज्योती चंद्रकांत सरतापे व त्यांचे पती चंद्रकांत मधुकर सरतापे यांनी प्रस्तापिताच्या मनमानी कारभाराला कंटाळून राजकुमार पाटील यांच्या गटात प्रवेश केला आहे.
यावेळी माजी प.स. सदस्या कुमुदिनी पाटील, युवा नेते पृथ्वीराज पाटील, सौ. कादंबरी पृथ्वीराज पाटील, यांचे हस्ते सर्वांचा सत्कार करून गटात स्वागत करण्यात आले. माळखांबी ग्रामपंचायतीमध्ये ९ पैकी ४ सदस्य राजकुमार पाटील गटाचे झाले आहेत.
यावेळी ग्रामपंचायत सदस्या सौ हेमलता अनिल जावीर, सहदेव कोडग, अनिल मारुती जावीर व माळेवाडी बोरगांव चे ग्रामपंचायत सदस्य संभाजी कुदळे आदि.उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा