Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, २३ जानेवारी, २०२४

काक्रंबा ता. तुळजापूर येथे शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती विविध उपक्रमाने साजरी.

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

   *मो.--9730 867 448*

            शिवसेना पक्षप्रमुख ,लोकप्रिय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार व धाराशिवचे लोकप्रिय खासदार ओमराजे निंबाळकर तसेच शिवसेना धाराशिव जिल्ह्याप्रमुख तथा धाराशिव कळंब चे लोकप्रिय आमदार कैलास दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवसेनेच्या ब्रीद वाक्या प्रमाणे ८०% समाजकारण २०%राजकारण या प्रमाणे प्रतिवर्षी प्रमाणे अनावश्यक खर्च टाळून हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांची जयंती सामाजिक विविध उपक्रमाने साजरी करण्यात आली .काक्रंबा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप करून जयंती साजरी केली.




 यावेळी कार्यक्रमास शिवसेना सोशल मीडिया तालुकाप्रमुख चेतन बंडगर, काक्रंबा गावचे सरपंच कालिदास खताळ राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शहाजी नन्नवरे, ज्येष्ठ शिवसैनिक दिलीप बंडगर,युवा सेना शाखाप्रमुख दीपक भिसे काक्रंबा ग्रामपंचायत सदस्य सद्दाम मुलाणी, विकास भिसे ,पवन वाघमारे, विकास चंदनशिवे, दयानंद वाघमारे, कार्तिक वाघमारे ,अनिल देडे, सुदाम भिसे ,काँग्रेस युवा नेते अक्षय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते विनोद साबळे,रामेश्वर घोगरे युवा उद्योजक -नामदेव झाडे, श्याम सुरवसे, समाधान हांडे ,रोहित म्हेत्रे ,राम पाटील, शाळेचे मुख्याध्यापक उंबरे मॅडम तसेच सर्व शिक्षक कर्मचारी समस्त शिवसैनिक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा