*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.--9730 867 448*
नवी दिल्ली - 13 जानेवारी :* आम आदमी पक्षाकडून राज्यसभेसाठी तीन उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले. यातील तिन्ही उमेदवार बिनविरोध निवडून आले. त्यामुळे आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात तुरुंगात असलेले संजय सिंह हे पुन्हा एकदा राज्यसभेवर गेले आहेत; तर त्यांच्यासोबत दिल्ली महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा स्वाती मालीवाल आणि 'आप'चे नेते नारायणदास गुप्ता हेही राज्यसभेवर बिनविरोध निवडून आले.
स्वाती मालीवाल 'आप'च्या पहिल्या महिला खासदार झाल्या आहेत. तीन जागांसाठी १९ जानेवारीला निवडणूक होणार होती. मात्र, अन्य कोणीही अर्ज दाखल न केल्यामुळे 'आप'च्या तिन्ही जागा बिनविरोध निवडून आल्या.
*साभार*
*कोकण न्यूज*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा