*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.--9730 867 448*
13 जानेवारी :* आशा व गटप्रवर्तक महिला यांच्या प्रलंबित मागण्या मंजूर झाल्या असल्या तरी शासनाने अजूनही लेखी आदेश काढलेला नाही. त्यामुळे आशा, गटप्रवर्तक महिलांनी १२ जानेवारीपासून बेमुदत संप सुरू केला आहे.
गेली अनेक वर्षे आशा व गटप्रवर्तक महिला आपल्या विविध मागण्यांसाठी वारंवार आंदोलने करत आहेत. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होत आहे. दोन महिन्यांपूर्वी या महिलांनी बेमुदत संपाची हाक दिली होती. त्यानंतर तब्बल महिनाभर संप सुरू होता. त्यावेळी यासंदर्भात ८ नोव्हेंबर रोजी सन्माननीय तडजोड झाली होती. त्यामध्ये महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिलेल्या आश्वासनानुसार शासकीय आदेश अद्याप मिळालेले नाहीत. त्यामुळे शासनाबाबत नाराजीचा सूर उमटत आहे.
महाराष्ट्रामध्ये ४ डिसेंबरपासून सुरू असलेल्या अंगणवाडी महिलांच्या संपाला पूर्ण पाठिंबा देण्यात आला आहे. २९ डिसेंबरपासून ऑनलाइन कामावरही बहिष्कार टाकला होता, आता १२ जानेवारीपासून बेमुदत संप सुरू केला आहे. यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा थोड्या फार प्रमाणात विस्कळीत होणार आहे. सरकारने त्याची तातडीने दखल घ्यावी, अशी अपेक्षाही संघटनेने केली आहे.
*साभार*
*कोकण न्यूज*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा