उपसंपादक - नूरजहाँ शेख
टाइम्स 45 न्युज मराठी
- KA मराठी प्रेरणा प्रतिष्ठान आयोजित राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेत कवी इंद्रजित पाटील यांना प्रथम क्रमांक मिळाला.या प्रतिष्ठानने मागील महिन्यात ' निराेप ' या विषयावर स्पर्धा घेतली हाेती.या स्पर्धेला महाराष्ट्रातून उदंड प्रतिसाद मिळाला. जवळजवळ १५४ कवींनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता.
सदर स्पर्धेचे आयोजन या संस्थेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा.श्री.राजेश नागुलवार यांनी केले हाेते तर परीक्षक म्हणून कवयित्री साै.प्रज्ञा दत्तात्रय घाेडके चिंचवड,पुणे यांनी काम पाहिले.वेळ अमावस्येचे आैचित्य साधून त्यांनी निकाल जाहीर केला असून स्व.साै.छायाबाई माधवराव कुतवळ चॅरिटेबल ट्रस्टचे सर्वेसर्वा जनसेवक अमाेल ( भैया ) माधवराव कुतवळ,तुळजापूर यांनी त्यांचे विशेष काैतुक केले.तसेच श्री.चंद्रकांत पाटील,रावसाहेब पाटील,अमाेल देशमुख,संजय भड यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील साहित्यिक कामगिरीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.कवी इंद्रजित पाटील यांची साहित्य क्षेत्रातील ही भरारी वाखाणण्याजोगी आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा