Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, ११ जानेवारी, २०२४

आशा व गटप्रवर्तकांच्या संपादरम्यान मान्य मागण्यांचा शासन निर्णय काढला नसल्याने ऑनलाईन कामावर बहिष्कार तसेच मंजुर मागण्यांचा जि. आर. न काढल्याने (दि.१२ जानेवारी पासुन) राज्यव्यापी बेमुदत संपाचा महाराष्ट्र राज्य आशा-गटप्रवर्तक कर्मचारी कृति समितीचा निर्णय

 


इंदापूर तालुका...... प्रतिनिधी एस. बी. तांबोळी, मोबाईल-8378081147

             -आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तकांच्या संपादरम्यान मान्य मागण्यांचा शासन निर्णय काढला नसल्यामुळे (दि. २९ डिसेंबर पासुन) ऑनलाईन कामावर बहिष्कार तसेच मंजुर मागण्यांचा जि. आर. न काढल्याने (दि.१२ जानेवारी पासुन) राज्यव्यापी बेमुदत संपाचा इशारा महाराष्ट्र राज्य आशा-गटप्रवर्तक कर्मचारी कृति समितीच्या वतीने निवेदनाद्वारे दिला आहे.

    राष्ट्रीय आरोग्य अभियानात राज्यात सुमारे ७० हजार आशा स्वंयसेविका व साडेतीन हजारापेक्षा अधिक गटप्रवर्तक कार्यरत आहेत. आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तकांनी दि. १८ आक्टोंबर ते दि.९ नोव्हेंबर २३ दरम्यान न्याय व रास्त मागण्यांसाठी राज्यव्यापी संप पुकारला होता. संप काळात आरोग्य मंत्री यांनी दि.१ नोव्हेंबर रोजी मुंबईत संपाच्या वाटाघाटीसाठी कृति समितीसोबत बैठक घेतली होती. 

    सदर बैठकीत आरोग्य मंत्र्यांनी खालील घोषणा केल्या - आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तकांना दिवाळी भेट रु. २००० दिवाळीपुर्वी देणार, आशा स्वंयसेविकांच्या मोबदल्यात रु.७००० ची वाढ,गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात रु.६२०० ची वाढ, आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तकांनी संप काळातील कामकाज पुर्ण केल्यास त्यांना संपकाळातील मोबदला देण्यात येईल असे घोषित केले होते. त्यानुसार आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तकांनी संपकाळातील कामे पूर्ण केली. परंतु त्यांचा मोबदला कपात करण्यात आला आहे. तरी कपात केलेला मोबदला पुन्हा अदा करण्याचे आदेश काढण्यात यावेत.

      गटप्रवर्तकांचा मोबदला समाधानकारक वाढवला नसल्याने संप पुढे लांबला होता. यासाठी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी मुख्यमंत्र्याकडे गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात समाधानकारक वाढ करण्यासाठी शिफारस केली. त्यानंतर दि.९ नोव्हेंबर रोजी अप्पर मुख्य सचिवासोबत कृति समितीची बैठक खासदार हेमंत गोडसे यांच्या उपस्थितीत पार पडली. बैठकीत मुख्यमंत्र्यानी अप्पर मुख्य सचिव मिलिंद म्हैसेकर यांना मोबाईल फोनवरुन गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात ६२०० वरुन १०००० रुपयांची वाढ करण्याचे आदेशीत केले. त्यानंतर कृति समितीने संप स्थगीत करून दि.१० नोव्हेंबर पासुन राज्यातील आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तकांनी कामकाजास सुरुवात केली. तसेच सर्वच ऑनलाईन कामे करण्याचे आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तक दिवसरात्र मेहनत घेवुन करत आहेत.

     संपाच्या दिड महिना नंतरही अदयाप शासन निर्णय निर्गमित करण्यात आला नाही. तसेच आरोग्य मंत्र्यांना कृति समितीच्यावतीने नागपूर हिवाळी अधिवेशनात दि. १८ डिसेंबर रोजी मोर्चा काढुन शासन निर्णय त्वरीत काढण्याची विनंती केली. परंतु त्याची दखल घेतली नसल्याने परीणामी राज्यातील आशा व गटप्रवर्तकांनी दि. २९ डिसेंबर पासून ऑनलाईन कामकाजावर बहिष्कार टाकला आहे.

   तसेच मंजुर मागण्यांचा शासन निर्णय दि. १२ जानेवारी पुर्वी निर्गमित करण्यात आला नाही तर राज्यातील सर्व आशा व गटप्रवर्तक राज्यव्यापी बेमुदत संपावर जाण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य आशा-गटप्रवर्तक कर्मचारी कृति समितीच्या वतीने देण्यात आला आहे. निवेदनावर एम.ए.पाटील, सुवर्णा कांबळे, आनंदी अवघडे, पुष्पा पाटील, सुमन पुजारी,

राजु देसले, भगवान देशमुख, रंजना गारोळे यांच्या सह्या आहेत.

फोटो - इंदापूर येथे आशासेविकांच्या वतीने तालुका आरोग्य अधिकारी डॉ सुरेखा पोळ यांना निवेदन देण्यात आले.

---------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा