*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448*
सांगलीतील हरभट रोडवरील एका "प्रख्यात शाळेत" इयत्ता 9 वीत शिकणाऱ्या एका शालेय विद्यार्थ्यांवर त्याच्याच वर्गमित्राने अमानवीय पद्धतीने कोयत्याने हल्ला केला. त्यात तो विद्यार्थी "गंभीर" जखमी झाला . मानेच्या नसा कोयत्याच्या वारामुळे तुटल्या असल्याने त्याच्यावर अतिशय तातडीने शस्त्रक्रिया केली गेली .त्यामुळे त्याचे "प्राण" वाचले गेले. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ऍनिमल " या चित्रपटाप्रमाणे मानेवर हुबेहूब 'वार" करण्यात आल्याने अशा हिंसक चित्रपटांना U सर्टिफिकेट देणे चुकीचे व "महागात" पडणारे ठरत आहे हे "सिद्ध" होते .
*"बालगुन्हेगारीचा विळखा "!*
समाजविघातक कृत्य करून एखादा डॉन त्या परिसराचा "हिरो" झालेला असतो . व त्याचे डझनभर फ्लेक्स (पोस्टर ) चौका -चौकात लागलेले असतात . तेंव्हा या "गुन्हेगाराचे" वलयांकित जीवन -प्रसिद्धी -हातात 10-10 सोन्याच्या अंगठ्या , आलिशान चारचाकी गाडी , 20-25 कार्यकर्ते आणि "पैशाची" वारेमाप लयलूट यामुळे कनिष्ठ व अत्यंत "दारिद्यावस्थेत" असणारी लहान मुले या व्यक्तिमत्वाकडे "आकर्षित" होतात . मोठा झाल्यावर त्यांना पण आपला फोटो फ्लेक्स वर यावा असे वाटते . त्यामुळे नैसर्गिक समंजसपणा यायच्या आधीच तो स्वतःला भाई समजू लागतो.आणि 13-14 वर्षीच त्याच्याच सवंगड्यावर "खुनी" हल्ला करतो .
*"गांजा- चरस चा अतिरेक "!*
सांगली - मिरज आणि कुपवाड मध्ये काही ठिकाणी गांजा आणि "अवैध" पदार्थांची "रेलचेल" आहे. एखादा गुन्हा करून आलेली फाळकुटदादा गुंड "रुबाबात" गांजा आणतो ..आणि ओढत बसतो . त्या परिसरात बिनकामाचे आणि चोऱ्या करून "उदरनिर्वाह" करणाऱ्या तरुणांचे बस्तान असते .त्यामुळे त्या तरुणासोबत उठ -बैस करणे ,त्यांची किरकोळ कामे उदाहरणार्थ किराणा दुकानातून काडीपेटी आणणे, पानपट्टी मधून सिगरेट आणणे , एखाद्या गांजाच्या "पंटर" कडून गांजाची 250 रुपयांची पुडी आणणे ,कंबरेला लावण्यासाठी आडोशाला लपवून ठेवलेले चाकू आणणे , त्या चांडाळ चौकडीची फुशारकी मारणारी "खोटी" कहाणी ऐकणे अशी सर्व कामे हा विद्यार्थी करतो. मध्येच गांजाचा एखादा कश - टेस्ट घेतल्यावर तो त्याचा दिनक्रम होऊन जातो. आणि अशाप्रकारे गुन्हेगारीच्या जगतात त्याची "एन्ट्री" होते.
(या वास्तव जगताचे मी स्वतः "निरीक्षण" केले आहे )
*गरिबी - कौटुंबिक कलह - शिक्षणाचा अभाव !*
वडीलच दारू पिऊन ,गांजा पिऊन ,सिगरेट ओढून येत असतील तर त्या मुलांना दारू - गांजा याचे काही विशेष वाटतं नाही. अल्पशिक्षित बाप ,मित्रांची वाईट संगत आणि गरिबी यामुळे त्या मुलाची पावले आपोआप "गुन्हेगारी" क्षेत्राकडे वळतात . बापच चोऱ्या करत असेल तर त्यालाही मुलाला तू चोरी करू नको हे सांगण्याचा अधिकार राहत नाही. कित्येकवेळा घरातील वातावरण दूषित असते. वडील आणि आई यामध्ये कडाक्याचे भांडण असते .त्यामुळे "सामाजिक स्वास्थ" असमतोल होते . अशा या कारणामुळे काय होईल ते होईल या आशावादावर लहान मुले "बालगुन्हेगार" बनतात . वाढत्या बालगुन्हेगारीमुळे शिक्षेचे वय "18 वरून 16 "असे आणण्यात आले आहे . परंतु आज केवळ 14 वर्षाच्या विद्यार्थ्यांकडून झालेला हा खुनी हल्ला धक्कादायक ठरत आहे .
*अँड्रॉइड मोबाईल आणि हिंसा !*
लहान वयात मुलांकडे मोबाईल आल्यामुळे मुले चित्रपट पाहतात . त्यात हिंसक चित्रपटातलं दृश्यांमुळे लहान मुलांवर विपरीत परिणाम होतो . नुकत्याच आलेल्या " ऍनिमल" चित्रपटात हिरो व्हिलन ची मान चाकूने कापून टाकतो .असे चित्रपट लहान मुलांवर विपरीत परिणाम करणार नाहीत का ??? चाकूने हल्ला करणारे, रिव्हॉल्वर ने गोळी झाडणारे अनेक "गेम्स" मोबाईल मध्ये असतात . त्यामुळे ही मुले भविष्यात असे कृत्य करत नसावीत ना ???
*सामाजिक बांधिलकीची अहवेलना ?*
100 फूट रोडवरील सामाजिक कार्यकर्ते , माझे मित्र - हितचिंतक जावेद मुल्ला हे हल्ला झालेल्या मुलाचे वडील! ज्यांनी कोरोना - महापूर यामध्ये "छातीचा कोट" करत हिंदू -मुस्लिम व सर्व समाजासाठी सर्वोतोपरी मदत केली. गरजवंतांच्या मदतीसाठी ते अग्रभागी असतात .आणि आज त्यांच्याच मुलावर असा प्रसंग येणे ही बाब दुर्दैवी आहे. सामाजिक बांधिलकेची ही अहवेलना नाही का ???
बालगुन्हेगारांना "परावृत्त" करणे ही ,पालक , शिक्षक , मित्र परिवार आणि सरकार या सर्वांची जबाबदारी आहे . आजचा विद्यार्थी बालक उद्याचे भारताचे "भविष्य" आहे . त्यामुळे या बालगुन्हेगारी मानसिकता बदलणे गरजेचे आहे. बालगुन्हेगारीचा विळखा संपूर्ण कुटुंब उध्वस्त करत असतो. त्यामुळे हे रोखण्यासाठी आता सर्वाना "सामूहिक प्रयत्न " करावेच लागतील. धन्यवाद !
. इकबाल बाबासाहेब मुल्ला
(पत्रकार)
संपादक - सांगली वेध
संपादक - वेध मीडिया न्यूज ,सांगली .
मोबाईल - 8983587160
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा