Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, ३० जानेवारी, २०२४

दहिगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रश्न मार्गी लावणार, म.वि.से.-- लोकसभा निवडणुकीत उतरण्याचे दिले संकेत+-- रोशन मंदिर त्यांच्याबरोबर पं.स.व जि. प. निवडणूक लढविण्याची घोषणा-- दहिगाव येथे महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या शाखेचे उद्घाटन....

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

*मो.9730 867 448*

                मौजे दहिगाव ता.माळशिरस येथे महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या शाखेचे उदघाटन पक्षप्रमुख किरण साठे यांच्या हस्ते करण्यात मोठ्या उत्साहात संपन्न झाले..

यावेळी जिल्हा परिषद सदस्य शरद बापू मोरे,महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे राज्य समन्वयक अजित साठे,प्रदेश सचिव अनिल साठे,दहिगाव च्या सरपंच सोनम खिलारे,रणजित खिलारे,दत्ता रूपनवर,अक्षय डबडे,बापू वाघमारे,नातेपुते शहराध्यक्ष नारायण आवळे,उपाध्यक्ष अजय लांडगे,पिरळे गावचे शहराध्यक्ष राहुल खिलारे,उपाध्यक्ष रोहन सोनवणे,सचिव वैभव खिलारे,राहुल राणे,बापूराव बुधावले,मारकडवाडीचे शाखा अध्यक्ष महादेव मारकड,सचिन मारकड,पत्रकार सचिन रणदिवे,सतीश साठे,रफिक मुलाणी,सूरज मोहिते,दहिगावचे शहर अध्यक्ष सनी खिलारे,शाखा अध्यक्ष सचिन खिलारे,नाना पवार,धीरज साळवे,किसन खिलारे,मामा अवघडे,नाना खिलारे,सिद्धार्थ गंगणे,चांद मुलाणी,गौतम मोरे,सुनील जगताप,अनिल खिलारे,नितीन खिलारे यांच्यासह गावातील ग्रामस्थ आणि पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



महाराष्ट्र विकास सेना पक्ष माढा लोकसभा निवडणुकीत उतरणार असल्याचे संकेत पक्षप्रमुख किरण साठे यांनी दहिगाव येथील शाखा उदघाटन प्रसंगी मार्गदर्शनपर विचार व्यक्त करताना दिले.दहिगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या विषयासाठी लवकरच मंत्रालयामध्ये जावून विषय मांडून तो मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचा शब्दही किरण साठे यांनी दहिगाव आणि पंचक्रोशीतील जनतेला दिला आहे.तसेच लोकसभा निवडणुकीनंतर येणाऱ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीत महाराष्ट्र विकास सेना पक्षाला सन्मानपूर्वक जागा देईल त्यांच्याबरोबर निवडणूक लढविण्याची घोषणा साठेनी केली आहे.महाराष्ट्र विकास सेना पक्षाने माढा लोकसभा मतदारसंघात शाखा उदघाटन कार्यक्रमाचा सपाटा लावला आहे.निमित्त जरी शाखा उदघाटन कार्यक्रमाचे असले तरी महाराष्ट्र विकास सेना पक्षाने तयारी मात्र निवडणुकीची सुरू केली आसल्याची चर्चा तालुक्यातील जनतेमध्ये चालू आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा