Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, १९ फेब्रुवारी, २०२४

*मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन यशस्वी झालं तर- भयंकर... प्रकाश आंबेडकरांचे मोठा विधान*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

*मो.9730 867 448

                सगेसोयऱ्याची अध्यादेशाचं कायद्यात रूपांतर करण्यासाठी मनोज जरांगे-पाटील 10 फेब्रुवारीपासून उपोषण करत आहेत. राज्य सरकारनं 20 फेब्रुवारीला बोलावण्यात आलेल्या विशेष अधिवेशनात याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. अशातच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मोठं विधान केलं आहे. "जरांगे-पाटील यांचं आंदोलन यशस्वी झालं, तर सत्ता आणि राजकारणातील उलथापालथ ही भयंकर असेल," असा दावा आंबेडकरांनी केला आहे. ते वर्ध्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

मनोज जरांगे-पाटील यांच्या जीवाला धोका असल्याचं सांगत प्रकाश आंबेडकरांनी सतर्क केलं होतं. याकडे प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधीनं लक्ष वेधल्यावर प्रकाश आंबेडकर म्हणाले, "एवढी वर्षे चळवळीचा अनुभव आहे. जरांगे-पाटलांचं आंदोलन यशस्वी झालं, तर सत्ता आणि राजकारणातील उलथापालथ ही भयंकर असेल. ही उलथापालथ न होण्यासाठी प्रयत्न केला जाईल. तो प्रयत्न होऊ नये म्हणून त्यांची औषधे, जेवण आणि पाण्यावर सरकारनं लक्ष द्यावं."

"बरेचजण अपघातात गेली, अचानकपणे मृत्यू झाल्याचं देशात घडलं आहे. त्यामुळे सरकारला मी सतर्क केलं आहे," असं प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं.

"ओबीसीचं ताट वेगळं पाहिजे. गरीब मराठ्यांचं नव्यानं निर्माण करण्यात येत असलेले ताट वेगळं पाहिजे. ते जर केलं, तर महाराष्ट्रात शांतात राहिल. विशेष अधिवेशनात सरकारची हीच भूमिका पाहिजे," अशी अपेक्षा प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केली.

"लोकसभेला भाजपच्या दीडशेच्यावरती जागा निवडून येणार नाहीत. चारशे हा आकडा सांगणं मानशास्त्राप्रणे स्वत:ला शाश्वत करण्यासारखं आहे. 'पराभव होतोय हे मला दिसतंय. पण, माझा पराभव होत नाही, हे स्वत:ची समजूत काढण्यासाठी 400 चा आकडा सांगणार,' अशी भाजपची परिस्थिती आहे. भाजपवाले पूर्णपणे घाबरलेले आहेत. म्हणून पक्ष, संघटना, आघाडी फोडाफोडी करणं चालू आहे. स्वत:चे घर शाबूत राहण्यासाठी दुसऱ्यांच्या घरावर बुलडोझर फिरवणे हे घाबरणाऱ्याचं काम असतं," अशी टीका प्रकाश आंबेडकरांनी भाजपावर केली आहे.

 

            *सौजन्य*

        *कोकण न्युज*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा