*अकलुज ----प्रतिनिधी*
*लक्ष्मीकांत कुरुडकर*
*मो;--7020 665 407
वाघोली तालुका माळशिरस येथे अकलूज ऍग्रो प्रोड्युसर्स कंपनी लिमिटेड व महाराष्ट्र ऍग्रो क्लिनिक अकलूज यांच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक भवन वाघोली येथे किसान पाठशाला चे संस्थापक डॉ बलराम भैय्या, यांचे "किसान युरोप निर्यात केळी उत्पादन" या विषयावर मार्गदर्शन मेळावा संपन्न झाला
कमी खर्चात केळी युरोपला निर्यात कसे करता येते यावर अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शन डॉ बलराम भैया यांनी केले मेळाव्यासाठी नांदेड ,धाराशिव, सोलापूर ,पुणे ,सांगली जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्र, गुजरात व तेलंगणा राज्याच्या काना कोपऱ्यातून शेतकरी उपस्थित होते अलीकडच्या काळात इंदापूर, माढा, अकलूज, भाग म्हणजे केळी निर्यातीचे" हब" बनले आहे सध्या अरब देशा त केळी निर्यात होत असून युरोपीय देशात केळी निर्यात सुरू करण्यासाठी आपल्या या भागात नियोजन सुरू केले आहे ,सरासरी एकरी 75 ते 80 हजारात युरोप निर्यात क्वालिटी काढण्याचे नियोजन डॉ बलराम भैया यांच्या मार्गदर्शनाखाली 150 शेतकऱ्यांनी केले आहे एकरी 35 ते 40 टन उत्पादन निघणार आहे युरोप निर्यातीसाठी तयार झालेल्या " संभाजी मिसाळ "यांच्या प्लॉटवर भेट देऊन माहिती घेतली व कौतुक केले सदर मेळाव्यासाठी अकलूज ऍग्रो चे संचालक- संजय रणनवरे, चेअरमन -दिलीप थोरवे व युरोप निर्यातक्षम केळी उत्पादक संभाजी मिसाळ तसेच वाघोली गावचे सरपंच उपसरपंच ग्रामस्थ व ग्रामसेवक यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा