*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष -अजित दादा पवार यांच्या गटाला दिल्यानंतर आता निवडणूक आयोगाने शरद पवार यांच्या गटाला "नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी -शरदचंद्र पवार" असे नाव दिले आहे
राष्ट्रवादी काँग्रेस मधील अजित पवार यांच्या गटाने मूळ पक्षावर व पक्षाच्या चिन्हावर दावा केला होता तो निवडणूक आयोगाकडे यावर सुनावणी होऊन निवडणूक आयोगाने अजित दादा पवार यांच्या बाजूने निकाल दिला आहे तसेच राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाने नवीन नावासाठी पर्याय सुचवावेत असे निर्देश निवडणूक आयोगाने दिले होते
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार शरद पवार गटाने तीन पर्याय सुचवले होते त्यातील "राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी --शरदचंद्र पवार "हे नाव निवडणूक आयोगाने शरद पवार गटाचे मान्य केले आहे त्यामुळे राज्यसभा निवडणुकीला ठोस नावानिशी सामोरे जाण्याचा शरद पवार गटाचा मार्ग मोकळा झाला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा