संपादक ---हुसेन मुलाणी
टाइम्स 45 न्युज मराठी
मो.9730 867 448
हजरत ख्वाजा कबीर बाबांच्या पदस्पर्शाने "पवित्र" झालेल्या आणि सर्वधर्मसमभावाचे प्रतीक असणाऱ्या नांद्रे या गावात इक्बाल मुल्ला यांचा निर्भीड- - सडेतोड पत्रकारितेचा "सन्मान" करण्यात आला .
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा श्रीमती जयश्रीवाहिनी पाटील यांच्या हस्ते सन्मानचिन्ह , शाल - श्रीफळ आणि रोख रक्कम देऊन "जिल्ह्यातील "उत्कृष्ठ पत्रकार" म्हणून इक्बाल मुल्ला यांचा सत्कार संपन्न झाला .
जयश्रीवाहिनी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त नांद्रे येथील ".एन .एस पाटील चॅरिटेबल संस्था नांद्रे "आणि "राम - रहीम कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ" यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य सोंगट्या स्पर्धा आणि विविध गुणदर्शन स्पर्धा संपन्न झाल्या.
यावेळी जयश्रीवाहिनी पाटील यांना "विठूमाऊली" यांची मूर्ती देण्यात आली .याशिवाय नांद्रे ग्रामपंचायत यांना "छत्रपती शिवाजी महाराजांची" प्रतिमा "भेट" देण्यात आली
नांद्रे येथील रामरहीम मंडळ ,बिरदेव मंडळ ,जय जिनेंद्र मंडळ हें सामाजिक एकोपा, सहिष्णूता आणि सर्वधर्मसमभाव जोपासत आपल्या विलोभनीय कार्याने संपूर्ण "महाराष्ट्रात" आपले नावं अजरामर केले आहे .
सूरज मुल्ला आणि मदनभाऊ पाटील यांचे ऋणानुबंध !
नांद्रे मध्ये सूरज मुल्ला आणि स्व. मदन पाटील व जयश्री पाटील यांच्या घराण्याशी असलेली अढळ निष्ठा कौतुकाचा विषय ठरली आहे .मदनभाऊ "हयात" असताना सूरज यांनी नांद्रे गावासाठी भाऊंच्या माध्यमातून लाखो रुपयाचा "निधी" खेचून आणला. निधीच्या माध्यमातून त्यांनी विविध कामे करत लोकांच्या "हृदयसिंहासनावर" विराजमान झाले आहेत . रक्तदान शिबीर ,करबल स्पर्धा आणि सोंगट्या स्पर्धाच्या माध्यमातुन त्यांनी जनमानसात वेगळा "ठसा" निर्माण केला आहे . मदनभाऊ अर्थात विजय बंगला चे एक "एकनिष्ठ शिलेदार" म्हणून सूरज मुल्ला यांचा सांगली जिल्ह्यत "नावलौकिक" आहे.
नांद्रे गावात अत्यंत यशस्वी ठरलेल्या विद्यमान स्पर्धामध्ये तानाजी माने ,धन्यकुमार पाचोरे ,मुस्ताक मुल्ला बाळू मुल्ला ,आरिफ मुल्ला ,तोफीक मुल्ला, रशीद मुल्ला या सर्वांचे योगदान महत्वाचे ठरले.
इक्बाल मुल्ला यांच्या निष्पक्ष पत्रकारितेची "दखल" नांद्रे ग्रामस्थांनी घेतली. त्यांचे मनःपूर्वक आभार !
*इकबाल बाबासाहेब मुल्ला*
( पत्रकार)
संपादक - सांगली वेध,
संपादक - वेध मीडिया न्यूज ,सांगली .
मोबाईल - 8983587160
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा