*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448*
ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील संकेत भोसले या शालेय विद्यार्थ्यांच्या हत्याकांडाच्या निषेधार्थ आज बुधवार दि. २८ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ११ वाजता वालचंदनगर पोलीस स्टेशन, जंक्शन येथे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरजभैय्या वनसाळे यांच्या नेतृत्वाखाली वालचंदनगर पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंखे सर यांच्याकडे निवेदन देण्यात आले. आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, क्रॉस गुन्हे माघारी घ्यावे, वेळेत लक्ष न दिलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी या निवेदनात म्हटले आहे.
आंबेडकरी चळवळ जिवंत राहवी त्याचप्रमाणे पॅंथर अजुन जागा आहे हे दाखवून दिले तर संकेतला न्याय भेटेल. व भविष्यात अशा प्रकारच्या हत्याकांडावर आळा बसेल. शाळेच्या आवारात साधा धक्का लागला म्हणून अपहरण करून अमानवी अत्याचार करुन कॉलेज मधील युवकाचा खुन केला हे योग्य नाही....एक दिवस समाजासाठी... एक दिवस चळवळीसाठी सर्वांनी दिला पाहिजे तर अशा घटना आटोक्यात येतील असे मत सुरज वनसाळे यांनी पत्रकारांजवळ व्यक्त केले.
यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरजभैय्या वनसाळे, राज्य सचिव अनिल केंगार, पुणे जिल्हा अध्यक्ष उत्तम भागवत, राजशिष्टाचार समितीचे मिलिंद भोसले, पुणे जिल्हा युवक उपाध्यक्ष अजय फले, निता शिंदे, अक्षय फले, रवि जाधव इ.पदाधिकारी हजर होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा