Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, २८ फेब्रुवारी, २०२४

बहुजन समाज पक्षाच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या अध्यक्षपदी ॲड. सुनील झेंडे यांची निवड

 


इंदापूर तालुका...... प्रतिनिधी एस. बी‌ तांबोळी, मोबाईल-8378081147

           बहुजन समाज पक्षाच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या अध्यक्षपदी ॲड. सुनील भारत झेंडे यांची निवड करण्यात आली. पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ॲड परमेश्वर गोणारे यांनी त्यांची निवड जाहीर केली.

    बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा कु. बहन मायावती व नॅशनल कोऑरडीनेटर आकाश आनंद व प्रदेश अध्यक्ष ॲड परमेश्वर गोणारे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार संघातील युवकांची मजबूत फळी उभारण्याचे प्राधान्याने काम करणार असल्याचे ॲड सुनिल झेंडे यांनी निवडी प्रसंगी बोलताना सांगितले.

    बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूर, बारामती, दौंड, पुरंदर, भोर-वेल्हा-मुळशी, खडकवासला विधानसभा मतदारसंघांना भेटी देवून पक्षाचे ध्येय, धोरणे विचार पोचविण्याचे काम करणार असल्याचे ॲड सुनिल झेंडे यांनी सांगितले.

फोटो - ॲड सुनिल झेंडे

---------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा