Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, १६ फेब्रुवारी, २०२४

*लक्ष्मीबाई कन्या प्रशालेची "कु. कृष्णा घुले "हिची राष्ट्रीय आर्चरी स्पर्धेत निवड*

 


*अकलुज ---प्रतिनिधी*

*केदार लोहकरे*

*टाइम्स 45 न्युज मराठी.

             हिंगोली येथे संपन्न झालेल्या १४ वर्षाखालील सब ज्युनिअर आर्चरी रिकवर राउंड स्पर्धेत लक्ष्मीबाई कन्या प्रशाला, यशवंतनगर शाळेची विद्यार्थीनी कु.कृष्णा प्रशांत घुले हिने प्राविण्य प्राप्त केले असुन तिची विजयवाडा (आंध्र प्रदेश) येथे होणा-या राष्ट्रीय स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे.

             कु.कृष्णा घुले हिने मिळविलेल्या यशाबद्दल प्रशालेच्या सभापती कु. स्वरूपाराणी मोहिते-पाटील यांनी तिचा सन्मान केला.तसेच शिक्षण प्रसारक मंडळाचे मार्गदर्शक जयसिंह मोहिते-पाटील,संस्थेचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते-पाटील,सचिव आभिजीत रणवरे,मुख्याध्यापिका सविता गायकवाड यांनीही तिचे आभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.या यशस्वी खेळाडूस क्रिडा शिक्षक अर्जुन बनसोडे यांचे मार्गदर्शन लाभले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा