*अकलुज ---प्रतिनिधी*
*केदार लोहकरे*
*टाइम्स 45 न्युज मराठी.
अकलूज येथे मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे-पाटील यांनी औषधोपचार घ्यावा या मागणीसाठी माळशिरस तालुक्यातील एका महिलेसह सात जण शुक्रवार, १६ फेब्रुवारीपासून अकलुज येथील महर्षी चौकात आमरण उपोषणास बसले आहेत.
माळशिरस तालुका सकल मराठा समाजाच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.आरक्षण पेक्षा समाजाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील महत्वाचे आहेत. त्यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावत चालली असूनही ते आपल्या मागणीवर व निश्चयावर ठाम आहेत.त्यांनी पाणी,उपचार सर्व वर्ज्य केले असल्याने समाजाच्या तोंडचे पाणी पळाले आहे.त्यांनी औषधोपचार घ्यावेत म्हणून समाजाने विनवण्या करूनही ते माघार घेत नसल्याने अखेर त्यांना भावनिक करण्यासाठी माळशिरस तालुका सकल मराठा संमाजाने हा निर्णय घेतला आहे.जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घ्यावे यासाठी सौ. अरुंधती हजारे या महिलेसह गणेश जाधव,अनिल कदम, रणजीत कदम,रणजीत गायकवाड,आशू ढवळे,नितीन साखळकर हे शुक्रवार पासून बेमुदत उपोषणाला बसले आहेत. व मनोज जरांगे पाटील यांनी औषधोपचार सुरू करेपर्यंत हे उपोषण करणार आहेत.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा