*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
परदेशातून डिग्री घेवून आल्यानंतर भारत सरकारने घेतलेल्या परीक्षेत फाॕरेन मेडीकल ग्रॕज्युएशन परीक्षेत डॉ.अभिराज संतोष शेंडगे हे प्राधान्याने प्रथम श्रेणीतच उत्तीर्ण झाले आहेत.
: डॉ.अभिराज शेंडगे यांचे दहावी पर्यंत चे शिक्षण अकलूज मध्ये झाले.पुढे उच्च माध्यमिक शिक्षण पुणे येथे झाले.त्यानंतर मेडीकल वैद्यकीय क्षेत्रात उच्च शिक्षण असलेल्या एमबीबीएस साठी जाॕर्जिया या देशात गेले. तिथे टिबलीशी शहरातील ग्रीगोल रोबॕकिजड् युनिव्हरसिटी मध्ये एमबीबीएस हि डॉक्टर ची पदवी संपादन केली.
आपल्या देशात आल्यानंतर भारत सरकार ची एफ. एम. जी. ए.हि परीक्षा परदेशातुन शिक्षण घेवुनआलेल्या विद्यार्थींसाठी द्यावीच लागते. हि परीक्षा पास झाल्याशिवाय डॉक्टरेटया पदवीला शासनाकडून मान्यता मिळत नाहि. या शासनाच्या परीक्षेत डॉ.शेंडगे हे प्राधान्याने उत्तीर्ण झालेले आहे. डॉ.शेंडगे हे वाघोली येथील प्रगतशिल बागायतदार संतोष शेंडगे यांचे कनिष्ठ चिरंजीव असुन पुणे जिल्ह्याचे तत्कालीन अतिरीक्त मुख्य कार्यकारीअधिकारी भारत शेंडगे यांचे डाॕ.अभिराज शेंडगे हे पुतणे आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे चे अधिक्षक अभियंता बी.एन.बहिर यांनी तसेच ग्रामपंचायत कोढारपट्टा च्या वतीने सरपंच प्रकाशराव जाधव-पाटील, यांच्यासह माजी सरपंच तात्यासाहेब बाबर, एमडी राजीव बनकर, भगवान घाडगे यांनी डॉ.शेंडगे यांचा सत्कार करुन शुभेच्छा दिल्या.डॉ.शेंडगे यांचे सर्व थरातुन अभिनंदन होत आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा