*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
मुंबई :-- राष्ट्रवादी आमदार अपात्र सुनावणी निकाल १५ तारखेला दिला जाणार आहे. राष्ट्रवादीच्या या निकालाकडे राज्याचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे, शरद पवारांना काही दिवसांपूर्वीच सर्वोच्च राजकीय धक्का बसला असून अजित पवार गटाला पक्ष आणि चिन्ह मिळाले आहे. त्यामुळे आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांना मोठा झटका मानला जात आहे.
आता निवडणूक आयोगाने अजित पवारांचा मार्ग प्रशस्त केल्याने आता आमदार अपात्रता निर्णय सुद्धा अजित पवारांच्याच बाजूने जाणार का? याचीही चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह हे अजित पवार गटाकडे गेल्यानंतर शरद पवार गटाला 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार' हे नाव मिळालं आहे. तीन पर्यायांमधून हे नाव मिळालं आहे.
*सौजन्य*
*कोकण न्यूज*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा