*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
मुंबई :-- मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सरकार विशेष अधिवेशन बोलावण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. मिळलेल्या माहितीनुसार, राज्य सरकार २० फेब्रुवारी रोजी हे एक दिवसीय विशेष अधिवेशन आयोजित करणार आहे.
‘मराठा समाजाला आरक्षण देणार’ हा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिला होता.त्यानुसार मराठा समाजाच्या अनेक मागण्या मान्य करत, ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत त्यांना ओबीसी दाखले देण्यास सुरुवात करण्यात आली.मराठा समाजाचे आंदोलक मनोज जरांगे यांनी सरकारपुढे ठेवलेल्या अनेक मागण्या सरकारकडून पूर्ण करण्यात आल्या.या मागण्यांच्या यादीत सगेसोयऱ्यांना देखील दाखले द्यावे अशी मागणी करण्यात आली. जरांगेच्या या मागणीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुणबीतील सगेसोयऱ्यांना देखील दाखले देण्याचे आश्वासन दिले.मात्र, १५ दिवस उलटूनही अध्यादेशाची अंमलबजावणी झाली नाही.त्यामुळे मनोज जरांगे पुन्हा आंतरवली सराटीमध्ये आमरण उपोषणाला बसले आहेत.
मराठा आरक्षणासंदर्भात सरकार देखील पुढे पाऊल टाकत आहे.मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार एक दिवसीय विशेष अधिवेशन घेण्याच्या तयारीत आहे. राज्य सरकार २० फेब्रुवारीला रोजी विशेष अधिवेशन आयोजित करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
*सौजन्य*
*कोकण न्यूज*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा