Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, ७ फेब्रुवारी, २०२४

*पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने-" माता रमाई" यांच्या जयंती निमित्त विद्यार्थ्यांना 'शालेय साहित्य 'व जिलेबी वाटप*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

*मो.9730 867 448

              भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी व बाबासाहेबांची प्रेरणा त्यागमूर्ती माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने अकलूज येथील विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला व माता रमाई यांच्या प्रतिमेला श्रेया भोसले अश्विनी भोसले अर्चना कांबळे सविता चव्हाण या महिलांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.



त्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोहितेवस्ती या ठिकाणी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई यांच्या प्रतिमांना अभिवादन करून श्रेया सोमनाथ भोसले अश्विनी किरण भोसले अर्चना हेमंत कांबळे सविता पांडुरंग चव्हाण शिक्षिका वर्षा ठोंबरे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वही पेन व जिलेबी वाटप करण्यात आली माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त आजचे कार्यक्रम महिलांच्या हस्ते घेण्यात आले.



यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले माळशिरस तालुका अध्यक्ष हेमंत कांबळे शाळेचे शिक्षक सोमनाथ झेंडे उपाध्यक्ष सदानंद बनसोडे तालुका संघटक पांडुरंग चव्हाण तालुका खजिनदार विश्वास उगाडे तालुका युवक कार्याध्यक्ष शिवम गायकवाड अकलूज शहराध्यक्ष शिवाजी खडतरे तालुका सहसंपर्क प्रमुख रोहिदास तोरणे तालुका युवक सरचिटणीस तुषार केंगार अकलूज शहर उपाध्यक्ष साजिद बागवान आकाश गायकवाड अनिकेत शिंदे यांचेसह या शाळेचे विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा