Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, ७ फेब्रुवारी, २०२४

*"निखील वागळे" यांच्या विरोधात -सुनिल देवधर -यांनी दाखल केली तक्रार*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

*मो.9730 867 448

           मुंबई 07 फेब्रुवारी:* भारतरत्न या देशातील सर्वोच्च नागरी सन्मानासाठी निवड झालेले भारतीय जनता पक्षाचे सहसंस्थापक तसेच भारताचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी अत्यंत अश्लाघ्य आणि अपमानजनक भाषेत ट्विट करणारे पत्रकार निखिल वागळे यांच्याविरोधात भाजपाचे माजी राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांनी पुणे येथील विश्रामबाग पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. सोशल मीडियावर वादग्रस्त वक्तव्य करणारे वागळे यांच्यावर एफआयआर दाखल व्हावा आणि समाजात अशांतता निर्माण करत असल्याबद्दल कठोर कारवाई व्हावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.

दोन दिवसांपूर्वी वागळे यांनी ट्विट करत ‘अडवाणींना दिलेला भारतरत्न पुरस्कार म्हणजे एका दंगेखोराने दुसऱ्या दंगेखोराला दिलेली शाबासकी! # मोदी # अडवाणी’ अशा प्रकारचे अत्यंत खालच्या पातळीचे ट्विट केले होते. त्यावरून प्रचंड संताप व्यक्त होत आहे. देवधर यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, वागळे यांनी हे विधान करून समाजात तेढ निर्माण करणे, दंगल माजविण्याचा प्रयत्न करणे यासाठीच हा आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध केला आहे. इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या सहाय्याने ते हा मजकूर वारंवार प्रसिद्ध करत आहेत. त्यामुळे समाजातील शांतता व सुव्यवस्थेला बाधा पोहोचत आहे. देवधर यांनी म्हटले आहे की, ऐन निवडणुकीच्या मुहूर्तावर सरकारी कामात अडथळे निर्माण करण्यासाठी असे कृत्य वागळे यांच्याकडून जाणीवपूर्वक वारंवार केले जात आहे.

देवधर यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले की, पत्रकार म्हणवणारे निखिल वागळे यांचा लोकशाही, कायद्यावर विश्वास नाही. समाजात अराजकवाद माजविण्याचा प्रयत्न करतात. वागळे यांना कुणी फार विचारत नाही म्हणून ते ट्विटरवर लिहितात. अडवाणींना आणि पंतप्रधान मोदींना दंगेखोर म्हणणे हे अत्यंत अपमानजनक आहे. त्यांनी पंतप्रधानांना हॅशटॅगही केलेले आहे. वागळे हे विसरतात की, भारतरत्न हा सन्मान राष्ट्रपतींच्या हस्ते दिला जातो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचाही त्यामुळे वागळे यांनी अपमान केला आहे. घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तींना उचलली जीभ लावली टाळ्याला अशा पद्धतीने त्यांनी हे वक्तव्य केलेले आहे. त्यासाठीच मी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी आलेलो आहे. मी यासंबंधी जी कलमे आहेत ती दिलेली आहेत. यावर कारवाई केली जाईल असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे. गुन्हा दाखल झाल्याशिवाय मी गप्प बसणार नाही.

              *सौजन्य*

            *कोकण न्यूज*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा