*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या संधी वेगवेगळ्या माध्यमातून मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्न करणारे तसेच महाविद्यालय,विविध विद्यापीठ,आंतरराष्ट्रीय समिती स्तरावरील त्यांचा प्रशासकीय अनुभव व काटेकोर नियोजन यासाठी डॉ.इंद्रजीत यादव यांना ओळखले जाते.परिणामावर आधारित शिक्षण व नवीन शैक्षणिक धोरण यांची सांगड घालून ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा कसा सुधारायचा यासंदर्भात त्यांनी लिहिलेले मार्गदर्शनपर लेख व पुस्तके याच पद्धतीच्या त्यांचा कामाचा अनुभव आर्यव्रत आंतरराष्ट्रीय विद्यापीठाला होण्यासाठी कुलपती डॉ.श्रीमती गुंजन बंसल यांनी त्यांची नियामक मंडळावरती नेमणूक केलेली असून त्यांचा या नेमणुकीचा फायदा त्रिपुरामधील आदिवासी व गोरगरीब विद्यार्थ्यांना होईल.या विद्यार्थींना विद्यापीठामध्ये प्रवेश देऊन समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये कसे आणता येईल व त्यांना भारतातील नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीची संधी कशी उपलब्ध होईल यासाठी डॉ. इंद्रजीत यादव यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
या निवडीसाठी त्रिपुरा राज्याचे महामहीम राज्यपाल श्री सत्यदेव आर्य व कुलगुरू डॉ.अनिश गुप्ता यांनी डॉ.इंद्रजीत यादव यांना शुभेच्छा दिल्या आहेत तसेच महाराष्ट्रामधील ग्रामीण भागात त्यांच्या या निवडीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा