Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, ६ फेब्रुवारी, २०२४

*"उद्धव ठाकरे" गटाच्या याचिकेवर सुनावणीस सुप्रीम कोर्टाची सहमती*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

*मो.9730 867 448

           नवी दिल्ली 06 फेब्रुवारी:-- शिवसेनेच्या आमदारांविरोधातील अपात्रतेची याचिका फेटाळण्याच्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या आदेशाला आव्हान देणार्‍या ठाकरे गटाच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने सहमती दर्शवली आहे. मागील महिन्यात राहुल नार्वेकर यांनी विधिमंडळातील नोंदी आणि बहुमताच्या आधारे एकनाथ शिंदे यांची शिवसेना खरी असल्याचा निकाल देत सर्व आमदार पात्र ठरविले.

ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी या खटल्याची लवकर सुनावणी घ्यावी, अन्यथा निवडणुका होतील, असा उल्लेख केला होता. यावर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड प्रमुख असलेल्या न्यायासनाने सुनावणी घेण्याबाबत सहमती दर्शवली. राहुल नार्वेकर यांनी 10 जानेवारी रोजी या प्रकरणाचा निकाल देताना, शिवसेना पक्ष हा बहुमताच्या आधारावर एकनाथ शिंदे यांचा असल्याचा निकाल दिल्याने उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला होता. शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले यांची नियुक्तीही नार्वेकर यांनी वैध ठरवली होती. उद्धव ठाकरे यांचे 14 आमदारही अध्यक्षांनी पात्र ठरविले होते.

                *सौजन्य*

             *कोकण न्यूज*






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा