*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
तुळजापूर तालुक्यातील मौजे माळुंब्रा येथील मागासवर्गीय समाजाच्या स्मानभुमीच्या कामाचे उद्घाटन माजी उपसरपंच रत्नदिप आबा वडणे,नागनाथ सुतार यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
माळुंब्रा गावातील मागासवर्गीय समाजाला गेली ७५ वर्षापुर्वी पासून ते आजतागायत मागासवर्गीय समाजाची स्मशानभूमी नसल्याने समाजातील अंत्यविधी ऊनवारा पावसात उघड्यावर केले जात होते. परिणामी पार्थिवाची अवहेलना होत होती प्रथमच धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या शिफारशीने व शिवसेने (ठाकरे) गटाच्या महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख शामलताई वडणे पवार यांच्या पाठपुराव्यातुन जिल्हा नियोजन समितीमधून माळूंब्रा गावच्या मागासवर्गीय समाजाची स्मशानभूमी मंजूर करून घेण्यात आले आहे.यानंतर स्मशानभूमी कामाचे प्रत्यक्षात उदघाटन करण्यात आले आहे.
यामुळे मागासवर्गीय समाजाच्या अंत्यविधीला आता निवारा मिळणार आहे
याप्रसंगी माजी उपसरपंच रत्नदिप आबा वडणे नागनाथ सुतार,नानासाहेब वडणे धनराज तुळसे, सचिन वडणे, बाळासाहेब वडणे, शाखा अभियंता ढेरे,उमेश आठवले, सुनील वडणे, सचिन पवार, संघर्ष तुळसे, प्रशांत वडणे, राजू तुळसे, सचिन तुळसे, माजी ग्रामपंचायत सदस्य सुनील तुळसे,तंटामुक्त अध्यक्ष गणेश वडणे, आदिंसह गावातील मान्यवर उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा