उपसंपादक - नूरजहाँ शेख
टाइम्स ४५ न्युज मराठी
थोर संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त लवंग २५/४ येथील फिनिक्स इंग्लिश स्कूलमधील चिमुकल्या मुलांनी स्वच्छता अभियानाचा उपक्रम राबवून शालेय परिसराची स्वच्छता केली.
अज्ञान,अंधश्रद्धा,आणि अस्वच्छता याबाबत समाजात जनजागृती निर्माण करणारे थोर संत व समाजसुधारक संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त फिनिक्स इंग्लिश स्कूलमधील लहान मुलांनी हातात खराटा घेऊन शाळेचा परिसर स्वच्छ केला आहे.
या कार्यक्रमाची सुरुवात संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन स्कूलच्या संचालिका नूरजहाँ शेख यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी मार्गदर्शन करताना शेख मॅडम म्हणाल्या की.मुलांना लहान वयात स्वचछतेचे महत्व समजावे.संत गाडगे महाराज यांच्या स्वच्छतेबाबतची जनजागृती करण्याचे काम शाळेतील चिमुकल्यांनी केलेले आहे.या कार्यक्रमाला मुले मोठ्या उत्साहात सहभागी झालेली दिसली .संत महात्म्यांनी दाखवलेल्या सन्मार्गांवर चालण्याचा आपण सदैव प्रयत्न केला पाहिजे .त्यांच्या अनमोल विचारांना आपण आत्मसात केले तर आपल्यासोबत समाजाचाही फायदाच होतो
शिक्षणाने माणूस शहाणा होतो असे गाडगेबाबा म्हणीत , माणसाला चांगले काय आणि वाईट काय हे शिक्षणामुळेच समजते .अज्ञानी अडाणी व्यक्ती अंधश्रद्धा बाळगतात .परंतु शिक्षित ज्ञानी लोक तर्किक विचार करून अंधश्रद्धा बाळगत नाहीत . शाळेहून थोर मंदिर नाही .देव देवळात नाही माणसात शोधावा .असे संत गाडगेबाबा म्हणत होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा