*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448*
"मुंबई : लोकसभा निवडणुकांचा बिगुल पुढील दोन महिन्यात वाजण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक हे सर्व पक्ष कामाला लागले आहे. महाविकास आघाडीच्या जागवाटपासंदर्भात दोन बैठका पार पडल्यानंतर आज तिसरी बैठक पार पडत आहे. मात्र त्याआधीच विदर्भातील 10 जागांसंदर्भात जागावाटप कसं राहिल, यासंदर्भात माहिती समोर येत आहे.
पूर्व विदर्भात सहा लोकसभा मतदार संघ आहेत. यातील नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा-गोंदिया आणि रामटेक या पाच मतदारसंघावर काँग्रेस निवडणूक लढण्याची शक्यता आहे. भंडारा-गोंदिया हा मतदारसंघ परंपरेने राष्ट्रवादी काँग्रेसकडे असायचा. मात्र अजित पवार यांनी 2 जुलै रोजी बंडखोरी करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यामुळे याचा फटका राष्ट्रवादी शरद पवार गटाला बसला आहे. त्यामुळे हा मतदार संघ काँग्रेससाठी सोडण्यास शरद पवार गट तयार झाला आहे, तर शिवसेना ठाकरे गटालाही एकनाथ शिंदे आणि काही आमदारांच्या बंडखोरीमुळे फटका बसला आहे. विद्यमान खासदार कृपाल तुमाने यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे परंपरेने आपल्याकडे असणारा रामटेक मतदार संघ काँग्रेससाठी सोडण्यास ठाकरे गटही तयार झाला आहे.
'या' मतदार संघावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये धुसफूस
वर्धा लोकसभा मतदार संघ परंपरेने काँग्रेसकडे आहे. मात्र यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाने वर्ध्यासाठी आग्रह धरला आहे. इतकेच नव्हे तर भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाच्या मोबदल्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाने वर्धा लोकसभा मतदारसंघाची मागणी केली आहे. त्यामुळे काँग्रेसही वर्धा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रावीद शरद पवार गटाला देण्याची शक्यता आहे.
पश्चिम विदर्भातील जागावाटप जवळपास निश्चित
महाविकास आघाडी च्या बैठकीत पश्चिम विदर्भातील चार लोकसभा मतदार संघातील जागावाटप जवळपास निश्चित झाल्याची माहिती समोर येत आहे बुलढाणा आणि यवतमाळ वाशिम या दोन मतदारसंघासाठी शिवसेना ठाकरे गटाने आग्रह धरला आहे त्यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मंजुरीनंतर हे दोन्ही मतदार संघ ठाकरे गटाला मिळण्याची शक्यता आहे तर अमरावती लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला मिळण्याची शक्यता आहे याशिवाय प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी पक्ष जवळपास महाविकास आघाडीमध्ये सामील झाला आहे त्यामुळे अकोला मतदारसंघ वंचित बहुजन आघाडीला मिळण्याची शक्यता आहे
विदर्भात महाविकास आघाडीचा असा असेल फार्मूला
विदर्भातील 10 लोकसभा मतदारसंघाचा विचार केल्यास 6 जागावर काँग्रेस दोन मतदारसंघावर शिवसेना ठाकरे गट तर राष्ट्रवाद शरद पवार गट आणि वंचित बहुजन आघाडी प्रत्येकी एका जागेवर लढण्याची शक्यता आहे याशिवाय याच आठवड्यात महाविकास आघाडी करून जागा वाटपाचीघोषणाही केली जाण्याची शक्यता आहे या संदर्भात माहिती सुत्राकडून देण्यात आली आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा