Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, २९ मार्च, २०२४

*गटविकास अधिकाऱ्यासहित 5 वसुंलदारांचा" जनशक्ती "कडून उपरोधिक सत्कार* *विभाग प्रमुखांच्या खुर्चीला घातला हार,- वाहिला पेढा!* *कुर्डूवाडी पंचायत समितीमध्ये पहिला मिळाला अनोखा गोंधळ*

 


*मुख्यसंपादक---हुसेन मुलाणी*

*टाइम्स 45 न्युज मराठी*

 *मो.9730 867 448


कुर्डूवाडी पंचायत समितीमध्ये या अगोदर दोन वेळा जनशक्ती संघटनेने अधिकाऱ्यांचे झाडाझडती घेत गैरहजर अधिकारी व कर्मचाऱ्यांवर बिन पगारी शेरा मारण्यासाठी आंदोलन केले होते. शिवाय सर्वसामान्य जनतेकडून होत असलेली लूट पाहता वेगवेगळी आंदोलन देखील केली होती. यामुळे वैतागलेल्या जनशक्ती संघटनेचे अतुल खूपसे पाटील यांनी बेशरम अधिकाऱ्यांसाठी आज सत्कार आंदोलन करत काही विभाग प्रमुखांच्या खुर्चीला हार घालून पेढ्याचा नैवेद्य अर्पण केला. त्यामुळे भांबवलेल्या अधिकाऱ्यांकडे पाहून एकच गोंधळ उडाला होता.




 याचे झाले असे की, तालुक्यातील मंजूर विहिरी संदर्भात शेतकऱ्यांकडून विविध कारणासाठी पैसे घेतले जात आहेत. यासाठी जनशक्तीचे अतुल खूपसे पाटील यांनी अधिकाऱ्यांची कान उघडणे केल्यानंतर थेट पैसे घेणे बंद केले होते. मात्र आता गटविकास अधिकाऱ्यांमार्फतच ग्रामसेवकांवर वेगवेगळे दबाव आणून पुन्हा पैसे उकळण्याचा कारनामा सुरू असल्याचा आरोप अतुल खूपसे यांनी केला आहे. त्यामुळे आज जनशक्तीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी गटविकास अधिकारी महेश सुळे यांच्यासह विवेकानंद फाळके, अक्षय क्षीरसागर, सुमित कांबळे,

शिवाजी येळे या कर्मचाऱ्यांचा सत्कार करत पाठीवरती कौतुकाची आणि शाबासकीची थाप टाकत असेच काम करा असा उपरोधिक सत्कार केला. 




शिवाय अरुण जाधव, शेख पाणीपुरवठा उपअभियंता, विकास यादव गटशिक्षणाधिकारी,

पी.के. हांडे बांधकाम उपअभियंता, 

डॉ देवकते तालुका आरोग्य अधिकारी हे आज गुरुवार बाजारचा दिवस असताना देखील गैरहजर असल्याने त्यांच्या खुर्चीला हार घालून पेढ्याचा नैवेद्य दाखवण्यात आला...यावेळी 

सुरज धोत्रे बिभिषण शिरसट अक्षय देवडकर शरद सपाटे बालाजी तरंगे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा