*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
नांदेड जिल्ह्यातील पंचायत समिती नायगाव येथील वरिष्ठ सहाय्यक यु एस धोटे यांनी आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी सामान्य प्रशासन नांदेड जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल (भा.प्र.से.)यांनी जिल्हा परिषद नांदेड जिल्हा सेवा ( वर्तणुक) नियम
१९६४ मधील कलम ३वा ४चा भंग केल्या प्रकरणी निलंबीत करण्यात आले असल्याचे पञ देण्यात आले आहे.याबाबत सविस्तर माहिती पहा.
१. महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (शिस्त व अपील) नियम १९६४.
२. महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (वर्तणुक) नियम १९६७.
३. महाराष्ट्र नागरी सेवा (स्वियेतर सेवा, निलंबन, बडतर्फी, यांच्या काळातील प्रदाने) नियम १९८१.
४. सार्वत्रिक लोकसभा निवडणुक २०२४ ची आदर्श आचारसंहिता दिनांक. १६.०३.२०२४.
५. गट विकास अधिकारी, पंचायत समिती नायगांव यांचा अहवाल दिनांक. २८.०३.२०२४.
ज्याअर्थी संदर्भ क्रं. ४ नुसार, नांदेड जिल्हयामध्ये सार्वत्रिक लोकसभा निवडणुक २०२४ ची आदर्श आचारसंहिता दिनांक. १६.०३.२०२४ पासुन लागु झालेली असुन, संदर्भ क्रं. ०५ अन्वये, धोटे यु.एस. वरिष्ठ सहाय्यक, पंचायत समिती नायगांव यांनी वॉट्सअॅपव्दारे लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारावावतचा संदेश देऊन आदर्श आचारसंहितेच्या नियमाचा उल्लघंन केला आहे. यावरुन धोटे यु.एस. वरिष्ठ सहाय्यक हे महाराष्ट्र जिल्हा परिषद, जिल्हा सेवा (वर्तणुक) नियम १९६७ मधील कलम ३ व ४ चा भंग केल्याचे स्पष्ट होते.
त्याअर्थी संदर्भ क्रं. १ मधील तरतुदीनसार, . धोटे यु.एस. वरिष्ठ सहाय्यक, पंचायत समिती नायगांव यांना आदेशनिर्गमनापासुन जिल्हा परिषद सेवेतुन निलंबित करण्यात येत आहे. निलंबन काळात संबधिताचे मुख्यालय पंचायत समिती माहुर. हे राहील.
महाराष्ट्र नागरी सेवा (स्वियेत्तर सेवा, निलंबन, बडतर्फी यांच्या काळातील प्रदाने) नियम १९८१ चे नियम ६८ (एक) (ए) प्रमाणे अर्धवेतनी रजेवर असतांना जेवढे वेतन व भत्ते मिळत होते तेवढा निलंबन भत्ता अनुज्ञेय राहील. निलंबन काळात कोणताही खाजगी व्यवसाय संबधीतास करता येणार नाही तसे निर्दशनास आल्यास त्यांच्या विरुध्द नियमाप्रमाणे वेगळी शिस्तभंगाची कार्यवाही करण्यांत येईल.
माहितीस्तव.
१. मा. जिल्हा निवडणुक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी नांदेड यांना माहितीस्तव सविनय सादर.
२. मुख्य लेखा व वित्त अधिकारी जिल्हा परिषद नांदेड.
३. गट विकास अधिकारी पंचायत समिती नायगांव/माहुर यांना पुढील कार्यवाहीस्तव.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा